अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
अमोल झेंडे हे पोलिस दलात गेल्या ११ वर्षांपासून कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील दुष्काळी तालुका समजला जाणाऱ्या पुरंदर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील जन्म. प्रतिकूलतेवर मात करत अगदी पहिलीपासून ते एमपीएससीपर्यंत कोणताही खासगी क्लास न लावता घरच्या घरी अभ्यास करून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. पोलिस दलातही मोठी कामगिरी पार पाडत असून, सध्या ते पुणे शहर पोलिस दलात पोलिस उपायुक्त (गुन्हे) म्हणून काम पाहत आहेत. अभ्यासू पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्या प्रेरणादायी वाटचालीविषयी थोडक्यात…

मराठी माध्यमातून शिक्षण…
अमोल भाऊसाहेब झेंडे यांचा दिवे (ता. पुरंदर) येथील सर्वसामान्य एकत्र शेतकरी कुटुंबातील जन्म. लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार, शांत, हसतमुख अशी त्यांची ओळख. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण दिवे येथे मराठी माध्यमातून झाले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण फलटण येथे घेतले. बी.एसस्सी. अॅग्री पुणे येथे आणि एम.एससी अॅग्री कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी घेऊन मित्रांसोबत एमपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला.

वयाच्या २३व्या वर्षी पोलिस अधिकारी…
अमोल झेंडे हे पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार होते. आपल्या मुलाने पोलिस अधिकारी व्हावे, हे वडिलांचे सप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी एमपीएसीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २०१० मध्ये दिली आणि अव्वल गुणानुक्रमाने उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. वयाच्या २३व्या वर्षी डीवायएसपी म्हणून अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. नांदेड जिल्ह्यात वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.

आई-वडिलांचे स्वप्न…
वडील भाऊसाहेब व आई मंदाकिनी हे कोरडवाहू जमिनीत काम करून मुलांना शिक्षण देत होते. वडिलांची जुन्या काळातील दहावी झाली होती. पण, परिस्थितीमुळे त्यांना पुढे जाता आले नाही. पण, आपला मुलगा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्यामुळे त्याने अधिकारी व्हावे, असे आई-वडिलांचे स्वप्न होते. अगदी तसेच अमोल यांच्याबाबतचे होते. पहिलीपासूनच पहिल्या क्रमांकाने ते उत्तीर्ण होत असत. आई-वडिलांना याचा मोठा अभिमान होता. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमोल झेंडे यांनी ठरवले आणि वयाच्या २३व्या वर्षी पोलिस अधिकारी होऊन दाखवले.

एमपीएससीचा निकाल आणि अंजिराची बाग…
ग्रामीण भागातील मुलांना शेतीमध्ये काम करून शिक्षण घ्यावे लागते. अगदी अमोल झेंडे यांच्या बाबतीतही तसेच होते. पहिल्यापासून शेतीमध्ये काम करून कुटुंबाला हातभार लावण्याचे काम ते करत. शेतीकाम आणि अभ्यास हे समीकरणच होते. सुट्टीच्या दिवशी तर शेतामध्येच काम करण्यात दिवस जात असे. पण, शेतीकाम करत असतानाही वर्गातील पहिला क्रमांक कधी सोडला नाही. एमपीएससीचा अभ्यास करत असताना कोणताही क्लास लावला नाही. कारण, परिस्थितीची जाणीव होती. घरच्या घरी अभ्यास करून उत्तीर्ण होऊन दाखवायचे ही मनात बाळगलेली जिद्द होती. परीक्षा दिल्यानंतर शेतीमध्ये काम करत असत. एमपीएससीचा निकाल आला त्या वेळी सुद्धा ते अंजिराच्या बागेत काम करत होते. परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याचे समजल्यानंतर कुटुंबीयांसह त्यांनाही मोठा आनंद झाला.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन पुस्तक खरेदी करा…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl


पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!