विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)

विजयकुमार पळसुले हे गेल्या ३५ वर्षांपासून महाराष्ट्र पोलिस दलामध्ये कार्यरत आहेत. पोलिस दलातील मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. सामाजिक बांधीलकी जपत यशस्वी पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी विविध कामे केली आहेत. जमिनीवर पाय असणारा आणि समोर येणाऱ्या प्रत्येकाला इज्जत देणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. सध्या ते पुणे शहर पोलिस दलामध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर कार्यरत असून त्यांच्याविषयी थोडक्यात…

विजयकुमार पळसुले यांचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला असल्यामुळे जन्मजात कोल्हापूरचा रांगडेपणा आणि मनमोकळेपणा हे लाल मातीचे गुण स्वभावात दिसून येतात. पोलिस अधिकारी म्हणून कर्तव्य करताना प्रत्येकाला न्याय देणारा अधिकारी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. पोलिस दलातील दीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी असून विविध ठिकाणी काम करत असताना त्यांनी अनेकांशी जिव्हाळ्याचे नाते जोडल्याचे दिसून येते. त्यांच्या स्वभावामुळे जनतेच्या सहाय्याने जनतेची कामे यशस्वीपणे करण्याची त्यांची पद्धत यशस्वी ठरली असून राज्याच्या विविध ठिकाणी त्यांच्या असलेल्या लोकप्रियतेमुळे विविध नागरिकांशी मैत्रीचे संबंध अबाधित राहिले आहेत, हीच त्यांच्या कामाची मोठी पावती असल्याचे ते मानतात.

पोलिस खात्याचा वारसा…
विजयकुमार पळसुले यांचे वडील पोलिस खात्यामध्ये कर्तव्यास असल्यामुळे त्यांनी लहानपणापासून अनेक नामवंत पोलिस अधिकारी अतिशय जवळून पाहिले असल्यामुळे त्यांना खाकी वर्दीचे आकर्षण निर्माण झाले. त्यामधूनच त्यांनी पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पहिले आणि मेहनतीने ते प्रत्यक्षात उतरवले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण…
कॉमर्समधून पदवी प्राप्त झाल्यानंतर सन १९८७ मध्ये पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात आली. त्यामध्ये मेहनतीने ते पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होऊन सन १९८८ मध्ये त्यांची पोलिस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झाली आणि ते पोलिस प्रशिक्षण महाविद्यालय, नाशिक येथे प्रशिक्षणास हजर झाले.

सुरुवातीलाच मिळाले बाळकडू…
पहिले पोस्टिंग त्या वेळी पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील महत्त्वाच्या पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये झाले. त्या वेळी पिंपरी-चिंचवडमध्ये असलेल्या टेल्को कंपनीमध्ये संप सुरू होता. कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. ते आंदोलन जवळून हाताळण्याचा अनुभव मिळाला. त्यामुळे याचा त्यांना पुढील आयुष्यामध्ये मोठा फायदा झाला. थोडक्यात नोकरीच्या सुरुवातीलाच कायदा व सुव्यवस्था हाताळण्याचे बाळकडू मिळाले होते.

१९९० मध्ये कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये बदली झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या ठिकाणी नेमणूक झाली होती. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये टोळीयुद्ध सुरू असल्यामुळे पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तथापि विजयकुमार पळसुले आणि विजयसिंह गायकवाड या जोडगोळीने गुन्हेगारी मोडून काढण्याचे ठरवले आणि काही दिवसांतच खतरनाक असलेल्या डोंबे गटाचे गुन्हेगारीतील वर्चस्व संपवून टाकले. त्यांच्यावर TADA कायद्यान्वये केलेल्या कारवाईमध्ये डोंबे गटाच्या प्रमुख आरोपींना शिक्षा लागली होती. TADA कायद्यान्वये करण्यात आलेली महाराष्ट्र राज्यातील ही पहिली यशस्वी कारवाई होती. त्यानंतर त्यांची बदली मंद्रूप पोलिस स्टेशन येथे प्रभारी अधिकारी म्हणून करण्यात आली होती.

१९९२ साली पुणे ग्रामीण घटकामध्ये बदली झाल्यानंतर सुरुवातीला स्थानिक गुन्हे शाखेत नेमणुकीस असताना केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांना राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जेजुरी पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी म्हणून नेमण्यात आले. त्या ठिकाणी जनतेला विश्वासात घेऊन जेजुरी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हेगारीवर आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करून पोलिसांची जनमानसामध्ये चांगली प्रतिमा निर्माण केली. जेजुरीच्या सर्व यात्रांमध्ये चोख बंदोबस्त ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही.

पोलिस वेल्फेअरची कामे…
जेजुरी पोलिस स्टेशन येथे कर्तव्य करत असताना नागरिकांच्या सहकार्याने आणि श्रमदानातून पोलिस कल्याणाची कामे करताना बंदोबस्तासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी विश्रांती गृह, वाल्हा पोलिस आउट पोस्ट इमारत बांधकाम केले. नीरा पोलिस आउट पोस्टसाठी जागा नसल्यामुळे कामकाज जकात नाक्याच्या खोलीत सुरू होते, त्यामुळे तत्कालीन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नीरेला मोक्याच्या ठिकाणी जागा संपादित करून त्या ठिकाणी नीरा पोलिस आउट पोस्टची इमारत बांधली. याबद्दल वरिष्ठांनी त्यांचा यथोचित गौरव केला आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन पुस्तक खरेदी करा…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl


पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!