
मुंबईत मैत्रीच्या ओळखीचा गैरफायदा! सामूहिक बलात्कार…
मुंबई: नालासोपारा येथे एका 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.
मुंबईत राहणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीला फिरायला जाऊ असे सांगून आरोपीने तिला रिक्षातून नागीनदास पाडा येथील निर्जनस्थळी नेले. तिथे तिच्यावर आरोपी आणि त्याच्या मित्राने बलात्कार केला. पीडित मुलीची एक मैत्रीण नालासोपार्यात राहते. तिला भेटण्यासाठी ती अधून मधून नालासोपार्याला यायची. मैत्रीणीच्या घराशेजारी असणाऱ्या एका फोटो स्टुडियोत काम करणार्या युवकाची आणि तिची ४ ते ५ दिवसांपूर्वी ओळख झाली होती. गुरुवारी आरोपीने तिला भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार पीडित मुलगी नालासोपारा स्थानकात आली. यावेळी आरोपीसोबत त्याचा मित्र सोबत होता. फिरण्याच्या बहाण्याने ते तिला रिक्षातून घेऊन गेले. काही वेळाने तिला नगीनदासपाडा येथील एका निर्जनस्थळी नेले. तीथे दोघांनी तिच्यावर बलात्कार केला.
तुळींज पोलिसांनी दोन्ही आरोपींवर पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती तुळींज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली.
बदलापूर हादरलं! दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराची A टू Z कहाणी…
पुणे! पॉक्सो गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या शिक्षकाने पुन्हा केलं नको ते कृत्य…
कोल्हापूर हादरले! मामानेच केली भाचीची अत्याचारानंतर हत्या; डोळा बाहेर…
शिक्षकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार, बेशुद्ध पडताच घटना उघड…
बलात्कार पीडितेचे नाव, फोटो शेअर केल्यास शिक्षा…
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांचा खळबळजनक आरोप…

