पुणे! दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – १ गुन्हे शाखेने आरोपीस २४ तासात केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – १, गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडी चोरीचे गुन्ह्यातील आरोपीस २४ तासात जेरबंद केले आहे. आरोपीकडून ८,८६,२००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ चे प्रभारी अधिकारी वपोनि नंदकुमार बिडवई, सपोनि प्रविण काळुखे, पोहवा ६९७३ पठाण, पोहवा २०६१ राठोड, पोशि ८७४२ पाटील व घरफोडी पथकातील अंमलदार पोशि १२००१ खरात, पोशि ८३४७ तेलंगे, पोशि ८३३४ पठाण असे कोंढवा पोलिस स्टेशन, गुन्हा रजि नं ३३२/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३),३३१ (४),३०५ या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. स्टाफमधील घरफोडी पथकातील अंमलदार पोशि १२००१ खरात व पोशि ८३३४ पठाण यांनी सीसीटीव्ही फुटेज व त्यांचे बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीप्रमाणे त्यांनी फिरोज मोहम्मद शेख (वय ४३, रा. गल्ली नं १, अशरफनगर, कोंढवा, पुणे) यास ताब्यात घेवुन त्याचेकडे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने अधिक तपास केला. त्याने दाखल गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याचे ताब्यातुन सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल हॅन्डसेट, घरफोडी चोरी करीता लागणारे साहित्य असा एकुण किं. रु. ८,८६,२००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यास पुढील कारवाईकरीता कोंढवा पोलिस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजन शर्मा, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलिस उप आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलिस आयुक्त गुन्हे- १ गणेश इंगळे, सहा पोलिस आयुक्त, गुन्हे २, राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान पवार, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे व पोलिस अंमलदार जहांगिर पठाण, खरात, तेलंगे, इरफान पठाण, प्रदीप राठोड, गणेश ढगे, मनिषा पुकाळे, महेश पाटील यांनी केली आहे.

पुणे शहरात युवकाचा खून करणाऱ्या आरोपींना २४ तासाच्या आत सोलापूर येथून केले जेरबंद…

पुणे! स्वारगेट पोलिसांनी सराईत गुन्हेगारास केले जेरबंद…

पुणे! आईने स्वतःचं प्रेमप्रकरण लपविण्यासाठी प्रियकराला मुलीसोबत ठेवायला लावले अनैतिक संबंध…

पुणे! आईने 10 वर्षांनी झालेल्या दोन चिमुकल्यांना पाण्याच्या टाकीत बुडवून मारलं अन्…

Cyber Crime! पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारे ताब्यात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!