
पुणे शहरातील २०२५ मधील गुन्हेगारी वास्तव आणि पोलिस आयुक्तांचे धडाकेबाज निर्णय…
(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com)
सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर गेल्या काही वर्षांत वेगाने विस्तारत आहे. मात्र २०२५ हे वर्ष पुण्यासाठी केवळ विकासाचे नव्हे, तर गुन्हेगारीच्या दृष्टीने चिंताजनक होते. पण, पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी घेतलेले धडाकेबाज निर्णय आणि कारवायांमुळे गुन्हेगारी क्षेत्राला आळा बसला…
पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, संघटित टोळ्या, कोयता हल्ले आणि सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी २०२४–२५ दरम्यान काही धाडसी, कठोर आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले. या निर्णयांमुळे पुणे पोलिसांची कार्यपद्धती, जनतेचा विश्वास आणि गुन्हेगारांवरील दबाव यामध्ये लक्षणीय बदल दिसून आला. पोलिस यंत्रणेचा आत्मविश्वास वाढला आणि कायद्यावरील लोकांचा विश्वास दृढ झाला.
पुण्यातील वाढता हिंसाचार : कोयता, खून आणि गोळीबार
२०२५ मध्ये पुण्यात कोयत्याने हल्ले ही मोठी समस्या बनली. विशेषतः मध्यवर्ती भाग, उपनगरं आणि झोपडपट्टी परिसरात तरुणांमधील किरकोळ वाद थेट प्राणघातक हल्ल्यांमध्ये रूपांतरित झाले.
– भरदिवसा सार्वजनिक रस्त्यावर कोयत्याने वार करून हत्या
– वर्चस्व, जुन्या भांडणांचा राग, सोशल मीडियावरील वाद
– काही ठिकाणी गणेशोत्सव, मिरवणूक किंवा सणाच्या काळात गोळीबार
या घटनांमुळे “पुणे सुरक्षित शहर आहे” ही प्रतिमा धुसर झाली. सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि महिला यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

कोयता गँग आणि तरुण गुन्हेगारांचा प्रश्न
पुण्यातील गुन्हेगारीत कोयता गँग हे नाव वारंवार समोर आले. यामध्ये बहुतांश आरोपी 18 ते 25 वयोगटातील तरुण आहेत.
यामागची कारणे :
– बेरोजगारी व आर्थिक अस्थिरता
– झटपट पैसा आणि दहशतीची मानसिकता
– सोशल मीडियावर गुन्हेगारांची “हिरो” प्रतिमा
– शिक्षण अपूर्ण राहणे व कुटुंबीय नियंत्रणाचा अभाव
किरकोळ गुन्ह्यांपासून सुरू झालेला प्रवास थेट हत्या किंवा खूनाच्या प्रयत्नांपर्यंत जातो, हे समाजासाठी अत्यंत धोकादायक लक्षण आहे.
संघटित गुन्हेगारी आणि गँगस्टर नेटवर्क
२०२५ मध्ये पुण्यात संघटित गुन्हेगारी देखील उघडकीस आली. काही कुख्यात गुंडांनी खोटे पासपोर्ट वापरून देशाबाहेर पळ काढल्याची प्रकरणे समोर आली. आहेत. बंडू आंदेकर, निलेश घायवळ ही टोळी यंदा चर्चेत राहिली. गुन्हेगारी केवळ स्थानिक न राहता आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण करत असल्याचे स्पष्ट झाले.
सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांचा वाढता विळखा
– डिजिटल अरेस्ट स्कॅम
– बनावट कॉल सेंटर्स
– बँक खात्यांमधून कोट्यवधींची फसवणूक
– सोशल मीडिया हॅकिंग व ब्लॅकमेल
सुशिक्षित, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा या फसवणुकीला बळी पडले. सायबर गुन्हे “दिसत नाहीत” पण त्यांचा आर्थिक व मानसिक परिणाम खोलवर होतो.
महिला, मुले आणि दुर्बल घटकांवरील गुन्हे
२०२५ मध्ये पुण्यात महिलांवरील छेडछाड, धमक्या, फसवणूक आणि काही गंभीर गुन्ह्यांच्या घटना नोंदल्या गेल्या. तसेच मुलांवरील गुन्ह्यांमध्येही वाढ दिसून आली. हे सामाजिक असंवेदनशीलतेचे लक्षण असून, केवळ पोलिस नव्हे तर समाज म्हणून आपली जबाबदारी अधोरेखित करते.
२०२५ हे वर्ष पुण्यासाठी इशारा देणारे वर्ष ठरले. वाढती गुन्हेगारी ही केवळ पोलिस यंत्रणेची समस्या नसून, ती संपूर्ण समाजाची आहे. कायदा, प्रशासन आणि नागरिक यांनी एकत्र येऊनच पुण्याला पुन्हा सुरक्षित, सुसंस्कृत आणि विश्वासार्ह शहर बनवता येईल. ‘सुरक्षित पुणे’ ही केवळ घोषणा न राहता, सामूहिक कृतीतून साकार व्हायला हवी.
पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या धडाकेबाज कारवाया…
पुणे शहरातील कायदा-स्वविवस्था मजबूत करण्यासाठी आयुक्त अमितेशकुमार यांनी २०२५ मध्ये अनेक धडाकेबाज आणि निर्णायक कारवाया केल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारांना कठोर इशारा, पोलिस प्रशासनात शिस्त, आणि गैरसोयीच्या वर्तनाविरुद्ध सुधारणा या तीन पैलूंवर भर देण्यात आला.
गुन्हेगारांना कडक इशारा व कारवाई
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हेगारांसाठी स्पष्ट संदेश दिला की: ‘आका, काका, कोणालाही सोडणार नाही’ व ‘सात पिढ्या लक्षात राहील असा धडा शिकवणार’ असे सज्जड इशारे त्यांनी दिले. हे गुन्हेगार आणि त्यांच्या टोळींना आव्हान देणारे होते. या घोषणेमुळे पुण्यातील खंडणी, दरोडेखोरी आणि इतर हिंसात्मक गुन्हेगार टोळींवर लक्ष ठेवण्याचे वातावरण तयार झाले.
सार्वजनिक घटनांवर नियमन आणि नियंत्रण…
पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुणे शहरात काही पब आणि क्लबमध्ये रात्री उशिरा सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले. शिवाय, कारवाया केल्यामुळे या निर्णयाचे पुणेकरांनी स्वागत केले. आयुक्त अमितेशकुमार यांची एक महत्त्वाची भूमिका म्हणजे पोलिस व्यवस्थेत अंतर्गत शिस्त आणि जबाबदारीची जागृती निर्माण करून दिली. कायदा प्रथम पोलिस यंत्रणेसाठीच लागू होतो, असा संदेश त्यांनी दिला.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणाचे तपशीलवार व पारदर्शक तपास करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी स्पष्ट केले की तपास कायदा आणि प्रक्रियेच्या चौकटीतून केला जातोय, तसेच कायदा सर्वांसाठी समान आहे हे सिद्ध करण्यासाठी कठोर कार्यवाही केली जात आहे. या भूमिकेमुळे लोकांमध्ये विश्वास जागृत करण्याचा प्रयत्न झाला.
गणेशोत्सव किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रमांवेळी रात्रीचा शांतता नियम पाळण्यासाठी आणि गुन्हेगारीवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सखोल सुरक्षा व नियमन तंत्र लागू केले गेले. आयुक्तांनी शासनाच्या सहकार्याने नवीन परिमंडळे आणि पोलिस ठाण्यांची स्थापना करुन नागरिकांना जलद प्रतिसाद देण्याची व्यवस्था सुधारली. ही पावले हे शहरातील कायदा-व्यवस्था व्यवस्थापन मजबूत करण्याच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाचे उदाहरण आहेत.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचे नेतृत्व “सर्जनशील पण ठाम” असे वर्णन करता येईल. केवळ गुन्हे नियंत्रणावर लक्ष नसून पोलिसांच्या चुकांवर त्वरित कारवाई करणारे ठरले.
पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचे २०२५ मधील महत्त्वाचे कार्य…
– कायदा-व्यवस्था मजबूत करणे
– गुन्हेगारीवर कडक कारवाई
– पोलिस प्रशासनात नैतिकता आणि शिस्त आणणे
– सार्वजनिक विश्वास वाढवणे
– तपास प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करणे
– राजकीय किंवा स्थानिक दबावाखाली गुन्हे मागे न घेणे
– प्रभावशाली व्यक्तींवरही FIR नोंद
– मोठ्या गुंडांवर थेट कारवाई
– सायबर फसवणूक हे पुण्यातील मोठे आव्हान असल्याने आयुक्तांनी विशेष लक्ष दिले.
– पब, बार, क्लब यांच्यावर रात्रीचे निर्बंध
– नियम मोडणाऱ्यांचे परवाने रद्द
– सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांवर तत्काळ कारवाई
– नाईटलाइफ नियंत्रणात, महिला सुरक्षेला प्राधान्य.
– गणेशोत्सव, मिरवणुकांमध्ये DJ, शस्त्रप्रदर्शनावर बंदी
– गुन्हेगारांना मिरवणुकीत प्रवेश नाकारणे
– CCTV, ड्रोन, अतिरिक्त बंदोबस्त
– सण शांततेत, मोठे अनुचित प्रकार टळले.
– अवैध शस्त्रांवर विशेष मोहीम
– गुंड टोळ्यांवर MCOCA/MPDA
– तक्रारींवर जलद कारवाई, नागरिक-पोलिस अंतर कमी.
– दबावाखाली न येता कायदेशीर तपास
– मीडिया व जनतेला स्पष्ट माहिती
– तपासात कोणालाही विशेष वागणूक नाही
– कायदा सर्वांसाठी समान हा विश्वास बळकट केला.
दरम्यान, पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी ठोस पावले उचलली. ज्याचे प्रत्यक्ष परिणाम नागरिकांना सुरक्षिततेत दिसतात. यामुळे पोलिस आयुक्त अमितेशकुमार हे प्रशासनात कडक शिस्तीचे अधिकारी असले तरी पुणेकरांची काळजी घेणारे अधिकारी ठरत आहेत.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!
पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त
पुणे पोलिस आयुक्तांनी एक लाख रुपयांच्या बक्षिसाची रक्कम दिली विभागून…
पुणे पोलिस आयुक्तांनी गुन्हेगारांना दिली तंबी…
पुणे पोलिस आयुक्तपदाचा अमितेश कुमार यांनी स्विकारला पदभार…

