पोलिसानं आयुष्य संपवलं; सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा…

मुंबई: प्रेयसीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या मानसिक त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून पोलिस शिपायानं आपलं जीवन संपवलं आहे. “जीव दे, नाहीतर तुझी नोकरी घालवू,” अशा शब्दांत प्रेयसीच्या आई-वडिलांनी धमकी दिल्यामुळे या पोलिसानं टोकाचं पाऊल उचलले आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे.

भैयासाब भीमराव व्हावळे (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. भैयासाब यांची ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई पोलिस दलात चालक पदावर नियुक्ती झाली होती. ते कलिना येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात आपले प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करत होते. मात्र, १५ मार्च रोजी सकाळी त्यांनी प्रशिक्षण केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी परभणीहून मुंबई गाठली.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

पोलिसांना भैयासाब यांच्या खिशात एक चिठ्ठी (सुसाईड नोट) सापडली आहे. या चिठ्ठीत त्यांनी आपल्या मृत्यूचं कारण स्पष्टपणे नमूद केले आहे. भैयासाब यांचे नांदेड जिल्ह्यातील हादगाव येथील दिव्या नावाच्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधांना मुलीच्या घरच्यांचा तीव्र विरोध होता. “दिव्याच्या वडिलांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली, तर तिच्या आईने ‘जीव दे नाहीतर तुझी नोकरी घालवतो’ असे म्हणत मानसिक छळ केला. त्यांच्या सततच्या धमक्यांमुळे मी आत्महत्या करत आहे,” असे पोलिसाने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

भैयासाब यांचे वडील भीमराव व्हावळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी दिव्याची आई आणि वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, नुकतीच नोकरी लागलेल्या एका तरुण पोलिस कर्मचाऱ्याने अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिस आत्महत्या! प्रेमाचे दोन शब्द कधी तरी बोलली असती, तर..

पोलिस निरीक्षकाने आत्महत्या करणार असल्याचं पत्र लिहिलं पोलिस महासंचालकांना…

बीड! बडतर्फ पोलिस अधिकारी सुनील नागरगोजे यांची आत्महत्या…

पुणे वाहतूक शाखेतील पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या…

लग्न ठरलं होतं! पुणे पोलिसाची आत्महत्या अन् कोल्हापूरमध्ये अंत्यसंस्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!