संतापजनक! महिलेवर अमानुषपणे बलात्कार अन् शरीरात ठोकले खिळे…

इंफाळ (मणिपूर): मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात गुरुवारी (ता. 7) रात्री तीन मुलांची आई असणाऱ्या महिलेवर (वय 31) अतिरेक्यांनी बलात्कार करून तिला जिवंत जाळले. शिवाय, परिसरातील जवळपास 20 घरांना आग लावली होती. पीडित महिलेचा शवविच्छेदन अहवाल आला असून, यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पीडितेला मारण्यापूर्वी तिच्या शरीराला खिळे ठोकण्यात आले होते. तिच्यावर अमानुषपणे बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला जिवंत जाळण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

पीडित महिलेच्या पतीनं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये म्हटले आहे की, ‘अतिरेकी पीडितेच्या घरात घुसले, त्यानंतर त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिला जिवंत जाळले.’ अतिरेक्यांनी त्या रात्री जैरावनमध्ये 17 घरं लुटून पेटवून दिली. हे आरोपी घाटी येथील संघटनेचे सदस्य असल्याचा संशय आहे.’

पीडित महिलेचा शवविच्छेदन अहवाल आला आहे. त्यानुसार पीडितेच्या उजव्या मांडीच्या मागील भागात मोठी जखम आहे. डाव्या मांडीच्या मध्यभागी एक खिळा आहे. पीडितेचा मृतदेह 99 टक्के जळालेला होता. शरीराचा वरचा उजवा भाग तर खालच्या बाजूचा काही भाग आणि चेहऱ्याची रचना गायब झालीय. यावरून पीडितेला मारण्यापूर्वी किती वेदना दिल्या असतील, हे स्पष्ट होत आहे.

संबंधित घटनेला जवळपास एक आठवडा होत आला असून सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांसह विविध सरकारी यंत्रणा कार्यरत करण्यात आल्या आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे. परिस्थिती नियंत्रणात राहावी, यासाठी आवश्यक ती खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

धक्कादायक! मूल होत नसल्याने भोंदूबाबासह दिराने केला सामूहिक बलात्कार…

धक्कादायक! नवऱ्यासमोर महिलेवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार…

पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…

पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…

धक्कादायक! तान्हुल्या बाळासमोरच सासरा, दिर आणि मामे भावाने केला बलात्कार अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!