मुळशी पॅटर्न! गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येमागची INSIDE STORY…
पुणे : गँगस्टर शरद मोहोळ याची लग्नाच्या वाढदिवशीच घराजवळ हत्या करण्यात आली. शरद मोहोळ सोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केल्याची माहिती पुढे आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून याबाबतचा तपास सुरू आहे. शरद मोहळ हत्याप्रकरणात पोलिसांकडून न्यायालयात महत्त्वाची माहिती सादर करण्यात आली आहे. मोहळच्या हत्येप्रकरणात अटक करण्यात आलेले […]
अधिक वाचा...ग्राहकाने एक चिकू दाबून पाहिला अन् नको ते घडले; पोलिसांचे आवाहन…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीन गावात एका चिकूवरून दोन गट भिडल्याची घटना घडली आहे. या घटनेत पाच ते सहा जण जखमी झाले असून, गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. चिकूच्या गाडीवर चिकू विकत घेताना एका ग्राहकाने एक चिकू दाबून पाहिला. चिकू दाबल्यामुळे तो फुटला त्यामुळे विक्रेता आणि ग्राहकामध्ये वाद […]
अधिक वाचा...भरधाव कारने चौघांना चिरडले विद्यार्थीनीसह वृद्धाचा मृत्यू अन्…
जळगाव : भरधाव कारने चार ते पाच जणांना चिरडल्याची घटना पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे गुरुवारी (ता. ४) सायंकाळी घडली. अपघातानंतर कार पलटी झाली. या अपघातात एका विद्यार्थीनीसह वृद्धाचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पाचोऱ्याकडून भरधाव वेगात कार जळगावच्या दिशेने जात होती. तेव्हा गोराडखेडा […]
अधिक वाचा...धक्कादायक! आरोपी निघाला पीडित युवतीचा सख्खा मावस भाऊ…
बारामती : मावशीकडे राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ यु ट्यूब ला व्हायरल करून त्याद्वारे संबंधित मुलीला ब्लॅकमेल केले जात होते. पोलिसांनी अखेर या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी पीडितेचा सख्खा मावस भाऊ निघाला आहे. शिक्षणासाठी मावशीकडे राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ यु ट्यूब ला व्हायरल करून त्याद्वारे संबंधित […]
अधिक वाचा...अहमदनगरमध्ये दर्शनासाठी जाताना भीषण अपघात; 3 ठार 8 जखमी…
अहमदनगर: अहमदनगर-दौंड महामार्गावर ट्रक आणि झायलो कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून ८ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अहमदनगर दौंड महामार्गावर आज (रविवार) सकाळी ११ वाजता ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. कारमधील सर्वजण हे श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील दर्गाच्या दर्शनासाठी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! गरम पाण्याचे पातेले अंगावर उलटल्याने चिमुकलीचा मृत्यू…
छत्रपती संभाजीनगर : आईने गॅसवर ठेवलेले गरम पाण्याचे पातेले अंगावर उलटल्याने अवघ्या पंधरा महिन्यांची चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शहरातील उस्मानपुरा भागात घडली आहे. नुरेन अजिम सय्यद असे मृत चिमुकलीचे नाव आहे. अजिम सय्यद हे शहरातील उस्मानपुरा भागात राहात असून, त्यांना 15 महिन्याची नुरेन नावाची मुलगी होती. नुरेनाच्या वडिलांसाठी आईने गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले […]
अधिक वाचा...पुणे शहरात पोलिसांसमोरच कोयता गँगने युवकांवर केला हल्ला…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील वडगाव शेरी परिसारत कोयता गँगचा पुन्हा धुडगूस घातला आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. वडगावशेरी परिसरात रविवारी (ता. २४) रात्री ११:४५ च्या सुमारास ही घटना घडली आहे. दोन गटात झालेल्या वादातून कोयत्याने हल्ला केला आहे. यामुळे स्थानिकांमध्ये दहशतीच वातावरण निर्माण झाले आहे. घटना घडली […]
अधिक वाचा...पुणे शहरात पत्नीचा छातीत जोरात बुक्क्या मारून केला खून…
पुणे: पत्नीने जेवण न दिल्यामुळे पत्नीच्या छातीत बुक्क्या मारून तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना कात्रज भागातील दत्तनगर परिसरात घडली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी तानाजी कांबळे नावाच्या नवऱ्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुरा तानाजी कांबळे (वय 42, रा. स्वामी समर्थनगर, दत्तनगर, कात्रज) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मुलगा पियूष तानाजी कांबळे […]
अधिक वाचा...बार्शी-धाराशिव रस्त्यावर पुन्हा अपघात; युवकाचा जागीच मृत्यू…
बार्शी, सोलापूर (आकाश वायचळ): बार्शी-धाराशिव रस्त्यावरील तांदुळवाडीजवळ पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली असून, यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला आहे. सलग दोन दिवस होत असलेल्या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. धाराशिव येथून स्कुटीवरून बार्शीच्या येणाऱ्या युवकांची ऊसाच्या ट्रॉलीला धडक बसून भीषण अपघात झाला. यावेळी झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार तर दुसरा युवक जखमी झाला आहे. […]
अधिक वाचा...पुणे शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रानेच केली मित्राची हत्या…
पुणे : पुणे शहरातील बालेवाडी परिसरात बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. राजेश कांबळे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे, तर राहुल शेषराव रिकामे आणि सय्यद जमीर उर्फ सहील बाब्या सय्यद असे हत्या केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. […]
अधिक वाचा...
