वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या पाठीवर कौतुकाची थाप…
वर्धा: वडनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावरील पोहणा शिवारात सशस्त्र दरोडा टाकून चार कोटी ५२ लाखांची रक्कम लुटणाऱ्या सहा आरोपींना अवघ्या पाच तासांत अटक करून तब्बल ३ कोटी ४६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांना नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी प्रमाणपत्र देत त्यांना सन्मानित केले आहे. नागपूर […]
अधिक वाचा...पोलिसकाकाने कर्तव्यावर असताना स्वत:वरच झाडून घेतली गोळी…
लातूर : कर्तव्यावर असलेल्या पोलिसकाकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पांडुरंग पितळे असे या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. लातूर येथील विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात ते कार्यरत आहेत. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस कॉन्स्टेबल पांडुरंग पितळे यांनी कर्तव्यावर असताना डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. […]
अधिक वाचा...पाचव्या प्रयत्नात IPS! ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये जिंकले होते एक कोटी…
नवी दिल्ली : देशातील अनेक युवक-युवती UPSC ची परीक्षा देऊन IAS, IPS होण्याचे स्वप्न पाहतात. यामध्ये काही जणांना यश येत असते तर काही जणांना अपयश. पण, अपयश ही यशाची पहिली पायरी समजली जाते. हिमाचल प्रदेशात असलेल्या मोहिता शर्मा यांनी पाचव्या प्रयत्नात UPSC परीक्षेत यश मिळवले होते. शिवाय, त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये एक कोटी रुपये जिंकले […]
अधिक वाचा...गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री. निलोत्पल यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन…
गडचिरोली (उमेशसिंग सुर्यवंशी): गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्या हस्ते पोलिस स्टेशन मुलचेरा येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व जिल्ह्यातील 51 व्या वाचनालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला. पोलिस संकुल अहेरी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या पोलिस उप-रुग्णालयाचे तसेच पोलिस स्टेशन मुलचेरा येथील नविन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन समारंभ यासोबतच “एक गाव एक वाचनालय” अंतर्गत रविंद्रनाथ टागोर […]
अधिक वाचा...जालना जिल्ह्याचे शैलेश बलकवडे नवे पोलिस अधीक्षक; पदभार स्वीकारला…
जालना: जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्या जागेवर शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. आयपीएस अधिकारी शैलेश बलकवडे यांनी यापूर्वी गोंदिया, नागपूर ग्रामीण, कोल्हापूर येथे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्य सरकारने […]
अधिक वाचा...जालना जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर…
जालनाः जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेनंतर गृहमंत्रालयाकडून जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जालना प्रकरणात ही पाहिली कारवाई समजली जात आहे. जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे या घटनेच्या विरोधात राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार […]
अधिक वाचा...वर्धा जिल्हा पोलिस दलाच्या इतिहासात प्रथमच रोजगार मेळाव्याचे आयोजन…
वर्धा (उमेशसिंग सुर्यवंशी): वर्धा जिल्हा पोलिस दलाच्या इतिहासात प्रथमच पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांचे संकल्पनेतून व ईला हायरिंग टेक्नोलॉजी यांच्या सहकार्याने पोलिस, सेवानिवृत्त पोलिस तसेच गृहरक्षकांच्या पाल्यांकरीता भव्य रोजगार मेळाव्याचे शुक्रवारी (ता. २५) आयोजन करण्यात आले होते. पोलिस मुख्यालय येथील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे वर्धा जिल्हा पोलिस दल व ईला हायरिंग टेक्नोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानाने […]
अधिक वाचा...माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर…
मुंबईः व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटिलिया बॉम्ब प्रकरणी अटकेत असलेले माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना जामीन नाकारला होता. त्यानंतर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना दिलासा देत […]
अधिक वाचा...धक्कादायक! पोलिस पत्नीसह दीड वर्षाच्या चिमुकलीचा चाकूने भोसकून केला खून…
बुलढाणा: एका व्यक्तीने महिला पोलिस कर्माचारी असलेली आपली पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर त्यानेही आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरासह पोलिस दलातही मोठी खळबळ उडाली आहे. चिखली तालुक्यात राहात असलेल्या पतीने पोलिस असलेल्या पत्नीला आणि दीड वर्षाच्या चिमुकलीला चाकूने भोकसले. दोघींची हत्या केल्यानंतर त्याने एका विहिरीत गळफास घेऊन […]
अधिक वाचा...निलंबित API सूरज विष्णू चंदनशिवे यांच्या खून प्रकरणाला धक्कादायक वळण…
पंढरपूर: निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे (वय 42, रा. वासूनद, ता. सांगोला) यांचा 3 ऑगस्ट रोजी वासूद परिसरात अज्ञात व्यक्तीने खून केला होता. या प्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वेगाने तपास करत मुंबई पोलिस दलातील सुनील मधुकर केदार (मुळगाव वासूद, ता. सांगोला) या पोलिसाला अटक केली आहे. निलंबित […]
अधिक वाचा...
