
शरद मोहोळ याच्या हत्येचा घेणार होते बदला; पुणे पोलिसांनी मोठा कट उधळला…
पुणे (संदिप कद्रे): कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येचा एका वर्षाच्या आत बदला घेण्याचा इरादा असलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मोहोळ हत्येचा बदला घेण्यासाठी दोन जण मध्य प्रदेशातून पिस्तुल घेऊन आले होते. मोहोळ टोळीच्या या दोघांनाही अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. शरद मालपोटे आणि संदेश कडू असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी सापळा रचून या दोघांना अटक केली आहे.
एक वर्षापुर्वी कोथरुड सुतारदरा येथील गुन्हेगार शरद मोहोळ याचा खुन झाला होता. खुनास एक वर्ष पुर्ण होत असल्याने त्यास प्रत्युत्तर व खुनाचा बदला घेण्यासाठी गुन्हेगार १) संदेश लहु कडू (वय २४ वर्ष रा. काळुबाई कॉलनी अथर्व विदयालय शेजारी कोथरुड पुणे) व २) शरद शिवाजी मालपोटे (वय २९ वर्ष रा. सुतारदरा पांडुरंग कॉलनी कोथरुड पुणे) यांनी अग्निशस्त्र आणलेबाबत मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे दिनांक २/०१/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या गोपनिय बातमीचे अनुषंगाने वरील इसमांना खराडी पुणे येथून ०२ पिस्टल, ०७ जिवंत काडतुस मोबाईल फोन असा एकुण १,१२,०००/ रु. कि. मुददेमाल ताब्यात घेण्यात आले आहे. सदर बाबत खराडी पोलिस स्टेशन येथे ०३/२०२४ आर्म अॅक्ट ३ (२५) अन्वये गुन्हा दाखल केला असून त्यांना गुन्हयात अटक करुन पोलिस कस्टडी घेण्यात आली आहे.
प्रताप मानकर: खेळ आणि वैचारीक खुराकाची सांगड घालणारा अधिकारी!
तपासामध्ये सदर गुन्हेगार यांनी गंभीर गुन्हा करण्याच्या उददेशाने सदर अग्नीशस्त्रे आणल्याचे निष्पन्न होत असल्याने सदर गुन्हयात बी एन एस १११, ६१ (ब) अन्वये कलमवाढ करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास चालू असून त्यामध्ये आणखी इतर आरोपींचीही नावे समोर येत असून सदर कटाचे सर्व धागेदारे शोधून काढणेकामी वरिष्ठ पोलिस अधिकारी सूक्ष्म परीक्षण करुन आहेत व इतर आरोपीना शोध व ताब्यात घेण्याकरीता गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली आहेत.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेशकुमार, रंजनकुमार शर्मा, सह पोलिस आयुक्त, पुणे शहर, शैलेश बलकवडे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे), पुणे शहर, निखील पिंगळे, पोलिस उप आयुक्त (गुन्हे) पुणे शहर, गणेश इंगळे, सहा. पोलिस आयुक्त गुन्हे – ०१, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली प्रताप मानकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा युनीट ०२, पुणे शहर, अमोल रसाळ, सहा. पोलिस निरीक्षक, आशिष कवठेकर, सहा पोलिस निरीक्षक, नितीन कांबळे, पोलिस उपनिरीक्षक, पोलिस अंमलदार अमोल सरडे, ओमकार कुंभार, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, विजय पवार, संजय आबनावे पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख, उज्वल मोकाशी, साधना ताम्हाणे, शंकर नेवसे, संजय जाधव, गणेश थोरात, निखिल जाधव, विनोद चव्हाण, राहूल शिंदे, हनुमत कांबळे यांनी केलेली आहे.

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू…
शरद मोहोळ प्रकरणाशी संबंधित ससूनमधून पळून गेलेल्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या…
गँगस्टर शरद मोहोळच्या पत्नीला पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या…
थरार! शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले…
Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड…

