हृदयद्रावक! सांगलीतील एकाच कुटुंबातील 6 जणांचा अपघातात जागीच मृत्यू; पाहा नावे…

सांगली : सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे कुटुंब बंगळुरुवरुन जतला ख्रिसमस सुट्टीनिमित्त गावाकडे येत असताना कंटेनर ट्रक कार गाडीवर पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. बंगळुरूच्या राष्ट्रीय महामार्गावरील नेलमंगळा तालुक्यातील तळकेरेजवळ ही दुर्घटना घडली आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

बंगळुरूच्या राष्ट्रीय महामार्गावर एक भरधाव ट्रक पलटी होऊन एका कारवर आदळला आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात सांगलीच्या जत गावातील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे रहिवासी असलेले चंद्रम इगाप्पागोळ हे ख्रिसमसची सुट्टी पडल्याने आपल्या कुटुंबियाना घेऊन चारचाकीने गावी निघाले होते. यावेळी बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत होते. यावेळी ट्रक थेट इगाप्पागोळ यांच्या कारवर पलटी झाला आणि कारचा अक्षरश चेंदामेंदा झाला. या घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. पती चंद्रम इगाप्पागोळ (४६), पत्नी धोराबाई (४०) मुलगा गण (16), मुलगी दिक्षा (10), आर्या (6), चंद्रम एगाप्पागोळ भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी (३५) अशी या अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत.

दरम्यान, चंद्रम इगाप्पागोळ हे मूळचे सांगलीच्या जत तालुक्यातील मोराबागी गावातील रहिवासी आहेत. ते बंगळुर येथे सॉफ्टवेअर कंपनीत होते. या अपघातात इगाप्पागोळ यांच्या कुटुंबियांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने जत गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी नेलमंगला वाहतूक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! नाशिकचे कुटुंब उपचारासाठी मुंबईला अन् समुद्रात बुडाले…

ताम्हिणी घाटात वऱ्हाडाच्या बसला अपघात; ५ जणांचा मृत्यू…

सांगलीत दुचाकी अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू…

कुर्ला बेस्ट बस अपघातातील चालकाचा खुलासा; म्हणून घात झाला…

IPS अधिकाऱ्याचा पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना अपघाती मृत्यू…

बारामतीजवळ मोटार अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!