नोकरी वाचवायची असेल तर मला खूश ठेव म्हणाला अन् गरोदर राहिल्यावर…

पाटणा (बिहार): किशनगंज येथील एका संस्थेत काम करणाऱ्या महिलेने तिच्या ऑफिसमधील पुरुष सहकाऱ्याविरूद्ध पोलीसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्ती नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत लैंगिक शोषण करत होती, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार, ‘संस्थेत माझ्यासोबत काम करणारा सहकारी माझं लैंगिक शोषण करत आहे. मी जर त्याला विरोध केला तर तो माझ्या कामातील चुका काढतो. मग नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत होता. मी जर त्याचं ऐकलं नाही तर तो माझी प्रत्येक गोष्ट ऐकावी लागेल, नाहीतर तुला नोकरी गमवावी लागेल. नोकरी वाचवायची असेल तर मला खूश करत राहा, असं म्हणायचा. साडेचार वर्षांपूर्वी 2020 मध्ये तो मला फूस लावून त्याच्या भाडेतत्त्वावरील घरी घेऊन गेला होता. तिथे त्याने माझ्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर तो सातत्याने माझं लैंगिक शोषण करू लागला. गर्भवती राहिल्यानंतर त्याने गर्भपाताचे औषध पाजले. मानहानी टाळण्यासाठी मी कुटुंबियांपासून ही माहिती लपवून ठेवली. पण त्यानंतर माझा संयम सुटला आणि न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.’

पोलिसांनी तक्रारीच्या आधारे प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी महिला पोलीस स्टेशनच्या प्रमुख सुनीता कुमारी यांनी सांगितले की, ‘पीडित महिला उपजिविकेसाठी एका संस्थेत नोकरी करत होती. त्या संस्थेत ढेकसारा येथील रहिवासी समीर कुमार बैठा या तरुणाशी तिची ओळख झाली. समीर कुमार या संस्थेत बुक कीपर पदावर कार्यरत आहे. तो महिलेच्या कामात छोट्या-छोट्या चुका काढत होता. नोकरी वाचवण्यासाठी पीडित महिलेला त्याचे ऐकून घ्यावे लागत होते. तो वाईट नजरेनं पाहत होता, असा देखील आरोप आहे. पीडित महिलेच्या जबाबाआधारे एफआयआर नोंदवला आहे. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.’

वहिनी आणि दिराच्या नात्याला काळीमा फासणारी घडली धक्कादायक घटना…

मेव्हणी घरात एकटीच असल्याचे पाहून दाजी घरात घुसला अन्…

पोलिस अधिकाऱ्याने विद्यार्थिनीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात; कोर्टात सगळं उघड…

हृदयद्रावक! प्रियकरासाठी व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् घेतला जगाचा निरोप…

धक्कादायक! प्रेम एकावर; सात फेरे दुसऱ्यासोबत अन् लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी…

पत्नीसोबत नको त्या अवस्थेत युवकाला पाहिलं अन् नवऱ्याने घेतला क्रूरपणे बदला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!