
कराळे मास्तरांना भर रस्त्यात कॉलर पकडून मारहाण…
वर्धा : वर्ध्यामध्ये कराळे मास्तरांना मारहण झाल्याची घटना घडली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप नितेश कराळे यांनी केला आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
वर्ध्याच्या उमरी येथे ही घटना घडली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते नितेश कराळे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बुथ लावण्याच्या कारणातून बाचाबाची झाली. बाचाबाचीचे पर्यावसान नंतर हाणामारीत झाले आहे. उमरीचे ग्रामस्थ आणि नितेश कराळे यांच्यात हाणामारी झाली. या घटनेनंतर सावंगी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. बूथवर कशाला आला, या कारणावरून वाद झाल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.
दरम्यान, नितेश कराळे हे शरद पवार गटासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रचार करत आहे. लोकसभा निवडणुकीसाठीही कराळे मास्तर यांनी शरद पवार गटाकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. पण, त्यावेळी तिकीट दिले गेले नाही. पण शरद पवार गटाच्या उमेदवारासाठी कराळे मास्तर यांनी प्रचार केला होता. कराळे मास्तर यांनी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शिक्षण आणि इतर सामाजिक मुद्यांवर नेहमी व्हिडीओ बनवत असतात. खास विदर्भाच्या शैलीतील भाषेमुळे कराळे मास्तर तरुणामध्ये लोकप्रिय आहेत.
आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदे यांची समीर भुजबळ यांना धमकी…
पुणे शहरात शरद पवार गटाचा नेत्यावर भरदुपारी हल्ला…
विरार प्रकरण! भाजपचे विनोद तावडे, राजन नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल…
अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला प्रकरणात पोलिसांची कारवाई…
अनिल देशमुख यांच्या गाडीवर तुफान दगडफेक, गंभीर जखमी, डोक्यातून रक्तस्त्राव…

