पुणे शहरातील काळेपडळ पोलिस तपास पथकाची धडाकेबाज कामगीरी…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील काळेपडळ पोलिस स्टेशनच्या तपास पथकाची धडाकेबाज कामगीरी केली असून, आरोपींकडून एकुण ०२ गावठी पिस्टल, ०४ जिवंत काडतूसे व ०१ मोबाईल जप्त केला आहे.

महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणून २०२४ च्या अनुषंगाने चालू असलेल्या आदर्श आचासंहिताच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक, काळेपडळ पोलिस ठाणे मानसिंग पाटील यांचे आदेशांन्वये काळेपडळ पोलिस ठाणेचे तपास पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक, अमित शेटे, पोलिस हवालदार ७७३९ दाऊद सय्यद, पोलिस हवालदार ७८३५ अमोल काटकर, पोलिस अंमलदार ८२१३ श्रीकृष्ण खोकले, पोलिस अंमलदार सद्दाम तांबोळी, पोलिस अंमलदार २४३३ महादेव शिंदे, पोलिस अंमलदार ८६४८ अतुल पंधरकर असे पो.स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करत होते.

पो. हवा. ७७३९ दाऊद सय्यद व पो. अं.८६४८ अतुल पंधरकर यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, काळेपडळ पोलिस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हेगार रितेश बाबासाहेब कसबे (रा. साठेनगर, तरवडेवस्ती, महंदवाडी रोड, हडपसर, पुणे) हा त्याचा मित्र राहुल संजय चौधरी याच्या सोबत देसाई हॉस्पीटचे पाठिमागे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ या ठिकाणी दोघे दखलपात्र गुन्हा करणेचे उद्येशाने आपले कब्जात काहीतरी संशयित चीजवस्तु आपले जवळ बाळगून वावरत आहेत. संशयित चीजवस्तु हि अग्निशस्त्र असण्याची दाट शक्यता आहे, अशी बातमी मिळताच, सदर ठिकाणी सहा. पोलिस निरीक्षक अमित शेटे यांनी सदरबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांना कळविले असता त्यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरी. अमित शेटे व वरील पोलिस स्टाफ असे देसाई हॉस्पीटलच्या मागे, पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या कच्च्या रोडच्या कडेला सर्व टिमला दिल्या. सुचनांप्रमाणे जावुन सर्वांनी मिळालेल्या माहितीची खात्री केली असतां, रेकॉर्डवरील गुन्हेगार रितेश बाबासाहेब कसबे (रा. साठेनगर, तरवडेवस्ती, महंदवाडी रोड, हडपसर, पुणे) हा त्याचा सोबतचा असणारा मित्र हे पोलिसांना पाहून संशयितरित्या स्थितीत आढळून आले. सर्व टीमने चोहोबाजूने त्यास घेराव घालून ताब्यांत घेतले. त्यावेळी त्यांची दोन पंचा समक्ष अंगझडती घेतली असता रितेश बाबासाहेब कसबे याच्याकडे कमरेच्या उजव्या बाजूस एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल मिळून आले.

अग्निशस्त्राची मॅगझीन काढुन पाहता त्या मॅगझिन मध्ये दोन जिवंत काडतूस मिळुन आले असता ती जिवंत काडतुसे मॅगझीन मधुन काढुन वेगळी मॅगझीन परत नमुद पिस्टलमध्ये लावुन त्यास ताब्यात घेतली प राहुल संजय चौधरी याच्या कमरेस डाव्या बाजुस एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल व पॅन्टचे डाव्या खिशात एक मोबाईल फोन व उजव्या खिशात दोन जिवंत काडतूस मिळुन आले. राहुल संजय चौधरी याच्याकडे मिळुन आलेल्या अग्निशस्त्राची मॅगझीन काढुन पाहता सदरची मॅगझीन ही खाली मिळुन आली असता सदरची मॅगझीन ही पुन्हा पिस्टलमध्ये लावून सदरची पिस्टल ही ताब्यात घेण्यात आली आहे. त्यांचे ताब्यात मिळुन आलेले अग्निशस्त्र व जिवंत काडतुसांबाबत त्याचेकडे कोणता अधिकृत परवाना आहे का? याचेबाबत विचारणा करता त्याचेकडे तसा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. त्याने साठेनगर, तरवडेवस्ती परीसरात दहशत करणेकामी सदरचे पिस्टल हे आपण जवळ बाळगल्याची कबुली दिली.

दोन लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल, चार जिवंत काडतुस सोबत एक मोबाईल फोन हे दहशत करणेचे उद्देशाने विनापरवाना, बेकायदेशिर व अनधिकृतरित्या आपले कब्जात बाळगले असताना मिळून आलेने त्यांच्या विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व मुंबई पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये काळेपडळ (वानवडी) पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचे ताब्यातून दोन लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल, चार जिवंत काडतुस सोबत एक मोबाईल फोन असा एकुण ९०,८००/- रुपये किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही अमितेश कुमार, पोलिस आयुक्त पुणे शहर, रंजन कुमार शर्मा, पोलिस सह आयुक्त पुणे शहर, मनोज पाटील, अप्पर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, आर राजा, पोलिस उप आयुक्त सो., परिमंडळ ५ व सहाय्यक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे, यांचे मागदर्शनाखाली मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, काळेपडळ पोलिस स्टेशन, पुणे शहर, यांचे सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक, अमित शेटे, पोलिस उप निरीक्षक संजय गायकवाड, पोलिस हवालदार ३९७७ दाऊद सय्यद, पोलिस हवालदार ७८३५ अमोल काटकर, पोलिस हवालदार ७३१८ परशुराम पिसे, पोलिस अंमलदार ८२१३ श्रीकृष्ण खोकले, पोलिस अंमलदार १००७० सद्दाम तांबोळी, पोलिस अंमलदार २४३३ महादेव शिंदे, पोलिस अंमलदार ८६४८ अतुल पंधरकर, पोलिस अंमलदार ८३०२ सुर्यवंशी यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

पुणे जिल्ह्यातील माजी उपसरपंचाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फेकले पाण्यात…

पुणे शहरात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेची मोठी कारवाई…

पुणे जिल्ह्यातील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी केले जेरबंद…

पुणे शहरात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह…

पुणे शहरात मॉर्निंग वॉक करताना पत्ता विचारण्याचा बहाना करून चैन चोरणारा ताब्यात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!