पोलिसांनी पकडली थार; 23 हजारचे कापले चालान अन् रेकॉर्ड पाहिले तर…

चंदीगड : हरयाणाच्या कॅथल येथील वाहतूक पोलिसांनी एका 24 इंचाचे टायर लावलेली जीप थांबवली आणि कारवाई केली. पोलिसांनी या वाहन चालकाला तब्बल 23 हजार रुपयांचा दंड ठोठावला. कारण, गाडीचे कोणतेच कागदपत्र चालकाकडे नव्हते. वाहतूक नियमांच्या विरोधात जाऊन गाडी मॉडिफाइड करण्यात आली होती. गाडीचे टायर साधारण 2 फूट रुंद होते. या सर्व कारणांमुळे गाडी जप्त करण्यात आली.

वाहनाच्या मागे-पुढे मोठ्या अक्षरांनी विशिष्ट जातीवाचक शब्द लिहिले होते. याशिवाय अनेक अशा गोष्टी लावल्या होत्या, ज्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. पोलिसांनी या गाडीचे कागदपत्र तपासायला सुरुवात केली. त्यावेळी ही गाडी थार नसून 19 वर्षे जुनी बोलेरो असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. बोलेरो गाडीचा अपघात झाला होता. यानंतर ही गाडी भंगारात विकण्यात आली होती. पुढे चालकाने भंगार वाल्याकडून ही गाडी विकत घेतील. तिला नव्या थारप्रमाणे डिझाइन केले. सध्या गाडीचे चालान कापून जप्त करण्यात आली आहे.

एका मॉडिफाइड थार जीपचे 23 हजाराचे चालान कापले. पण आम्ही गाडीचा रेकॉर्ड पाहिला तेव्हा ती गाडी थार नसून 19 वर्षे जुनी एक बोलेरो असल्याचे आमच्या लक्षात आल्याची माहिती वाहतूक डिएसपी सुशील प्रकाश यांनी दिली. अपघातानंतर विकलेली ही गाडी मॉडिफाइड करण्यात आली होती. एजन्सीकडून आलेल्या वाहतूक नियमांच्या अधिन राहून बनवल्या जातात. पण मॉडिफिकेशन करणे वाहतूक नियमांच्या विरोधात आहे, असेही ते पुढे म्हणाले.

Video: खासदार अमोल कोल्हे यांनी बजावली वाहतूक पोलिसाची भूमिका…

पोलिसांची मोठी कारवाई; 4,00,00,000 ही रक्कम कोणाची…

बाबा सिद्दिकी प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिष्णोई याला कॅलिफोर्नियामधून अटक

भगवान महादेवाने राक्षस त्रिपुराचा केलेला वध हा एक प्रकारचा एन्काऊंटरचः अशोक इंदलकर

Video: एका दुचाकीवर बसले चक्क 8 जण; पोलिस अधिकारी राहिला मोजत…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!