
सायबर क्राइम! पिंपरी-चिचंवड पोलिसांना जयपूरमध्ये जिवे मारण्याचा प्रयत्न…
पुणेः सायबर क्राइम गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी जयपूरमध्ये गेलेल्या पिंपरी-चिंचवडमधील पोलिस अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी जयपूर येथील स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका सायबर गुन्ह्यात पोलिस अटक करतील, अशी भीती दाखवून एक कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक केली. या गुन्ह्यातील आरोपी अक्षत गोयल याला पकडण्यासाठी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची एक टीम राजस्थान मधील जयपूर येथे गेली होती. या गुन्ह्यातील आरोपी मयांक गोयल हा अटक असून त्याच्या मदतीने अक्षत गोयल याचा शोध सायबर पोलिस घेत आहेत. तो राजस्थानमधील जयपूर येथे असल्याची माहिती मयांक याच्याकडून पोलिसांना मिळाली होती. पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांनी सापळा रचून आरोपी अक्षत गोयल याला पकडण्यासाठी पोहोचले होते.
आरोपी अक्षत गोयल हा त्याच्या इतर मित्रांसह काळ्या रंगाच्या चारचाकी गाडीत बसला होता. पोलिसांनी त्या गाडीला घेरून अक्षत आणि त्याच्या मित्रांना खाली उतरण्यास सांगितले. परंतु, थेट गाडी सुरू करून अक्षत याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला अडवण्यासाठी गाडीपुढे थांबलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी यांच्या अंगावर गाडी घालून अक्षत पळून गेला. घटनेनंतर स्थानिक पोलिस ठाण्यात स्वामी यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी अक्षत गोयल याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सायबर गुन्हेगारांची हिंमत! पुणे पोलिसांचा फोटो वापरून पैसे उकळण्याचा प्रयत्न…
सायबर गुन्हेगाराने खासदाराला घातला लाखो रुपयांचा गंडा…
युवतीची फसणवूक करणाऱ्यास सायबर पोलिसांनी घातल्या बेड्या…
बेरोजगार युवकाच्या खात्यात आले 1.25 कोटी, पोलिसांनी तपास केला अन्…
Video Call वर महिलेशी मैत्री; रोमॅन्टिक गोष्टी अन् पुढे…

