
सासू-सासऱ्यांनी धावत्या एसटीमध्ये जावयाचा आवळला गळा…
कोल्हापूर : कोल्हापूरच्या बस स्थानकात सापडलेल्या मृतदेहाप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या सासू-सासऱ्यांनीच ही हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
संदीप शिरगावे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. संदीप हा मूळचा शिरोळचा रहिवासी आहे. मध्यरात्री संदीपची हत्या करण्यात आली त्यानंतर सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यामुळे कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकात खळबळ उडाली होती. पण, पोलिसांनी संबंधित हत्येचा गुन्हा उघड केला असून, पुढील तपास करत आहेत.
दारू पिऊन मुलीला त्रास देत असल्याने सासू आणि सासऱ्याने मिळून संदीप शिरगावे याची गळा आवळून चालत्या एसटी बसमध्येच हत्या केली. बसमध्ये हत्या करून सासू सासऱ्यांनी संदीपचा मृतदेह आणून मध्यवर्ती बस स्थानकात ठेवला होता. सकाळी बस स्थानकाच्या परिसरात मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये या हत्या प्रकरणाची उकल केली आहे.
बापरे! सासऱ्याच्या प्रेमविवाहाची सुनेला साताजन्माची शिक्षा…
नवऱ्याने भर बाजारात पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले…
कोल्हापूरमध्ये व्यापाऱ्याची निर्घृण हत्या, चांदी गायब अन्…
कोल्हापूरमध्ये गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच चाकूने भोसकलं…
कोल्हापूर हळहळलं! दोन्ही मुलांच्या अस्थि विसर्जनापूर्वीच आईचाही मृत्यू…

