पुणे हादरलं! बुरखा घालून घरात शिरले अन् मुलींच्या डोळ्यादेखत केली हत्या…

पुणेः पुणे शहरातील कर्वेनगर परिसरात मुलींच्या डोळ्यादेखत वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. राहुल पंढरीनाथ निवगुंने (वय 42) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कर्वेनगर येथे श्रीमान सोसायटीमध्ये शुक्रवारी (ता. २०) रात्री अंदाजे एक वाजता घरात घुसून तिक्ष्ण हत्याराने राहुल पंढरीनाथ निवगुंने (वय, 42) यांची हत्या केली आहे. बुरखा घालून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी राहुल निवंगुने यांच्यावर हल्ला चढवला, या हल्ल्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री एक वाजण्याच्या सुमारास राहुल पंढरीनाथ निवगुंने यांच्या घराचा दरवाजा अज्ञातांनी वाजविला. इतक्या रात्री कोण आले असे म्हणून राहुल यांनी घराचा दरवाजा उघडला. आरोपीने त्यांचावर थेट धारदार शस्त्राने सपासप वार केले. यावेळी राहुल यांनी आरडाओरडा केल्या नंतर घरात असणाऱ्या तीन मुली आणि पत्नी जाग्या झाल्या, पण आरोपी तोपर्यंत घरातील दागिने आणि रोख रक्कम, किंमती वस्तुची लूट करुन पसार झाला आहे.

दरम्यान, राहुल हे एका खाजगी वाहनांवर चालक म्हणून काम करत असून त्यांना तीन मुली, पत्नी आहे. आरोपींनी तोंडावर बुरखा घातला होता. त्यामुळे मुलींनी आरोपीना पाहिले पण ओळखता आले नाही. डोळ्यासमोरच वडिलांची हत्या झाल्याने घडलेला प्रकार भयानक असल्याने त्यांचा मुलीचा मनावर मोठा आघात झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…

पुणे हादरलं! प्रेयसीची हत्या करून मृतदेह रिक्षासह आईच्या दारात सोडून प्रियकर फरार…

पुणे शहरात खूनसत्र थांबेना; युवकाची मध्यरात्री हत्या…

पुणे हादरलं! पुणे शहरात फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची हत्या…

पुणे शहरात गुंडाची हत्या; टोळक्याने पाठलाग करून ठेचलं…

वनराज आंदेकर यांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!