कोंढवा पोलिसांनी अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह मुद्देमाल केला जप्त…

पुणे (संदिप कद्रे): अवैधरित्या गावठी हातभट्टी दारुची वाहतूक करणारा टेम्पो व १९ दारुचे कॅण्डसह एकुण २,९८,५२५/- रु. किंमतीचे मुद्देमालासह कोंढवा पोलिस स्टेशनचे तपास पथकाने केले जेरबंद आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दिनांक १८/०८/२०२४ रोजी कोंढवा पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे पोलिस अधिकारी व अंमलदार हे हद्दीमध्ये वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना पो. अं. सुरज शुक्ला, पो. अं. शाहीद शेख व पो.अं. लक्ष्मण होळकर असे इस्कॉन चौक ते गोकुळनगर या भागात पेट्रोलिंग करत आले असता दुपारी १३/३० वा. चे सुमारास गोकुळनगर कडे जाणा-या रोडवर पो.अं. सुरज शुक्ला यांना एक तिन चाकी पॅगो टेम्पो गाडी क्रमांक एम.एच/१४/जे.पी/१३५३ ही संशयितरित्या मिळून आल्याने त्यांनी सदर तिन चाकी पॅगो टेम्पो गाडी रोडचे कडेला थांबवली. त्यामधील चालकास त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अरबाज नजीर सय्यद (वय २६ वर्षे रा. गल्ली नं.१७, सय्यदनगर, हडपसर, पुणे) असे असल्याचे सांगितले. अधिक विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

पोलिसांनी त्यास सोबत घेवुन पोलिस स्टेशन येथे आणुन सदर गाडीची तपासणी केली असता सदर पॅगो टेम्पो गाडीमध्ये काळे – निळे रंगाचे कॅण्डमध्ये गावठी हातभट्टीची दारु असल्याचे दिसल्याने लागलीच ड्युटी ऑफिसर मपोउपनि स्नेहल जाधव यांनी विनय पाटणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक व मानसिंग पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे), कोंढवा पोलिस स्टेशन यांना कळवुन त्यांनी कारवाईबाबत आदेश दिल्याने त्यांचे आदेशाप्रमाणे दोन पंचांचे समक्ष सदर पॅगो टेम्पो गाडीची तपासणी करता त्यामध्ये ९८,५२५/- रु. किंमतीची देशी हातभट्टीची तयार दारुचे १९ कॅण्ड प्रत्येक कॅण्डमध्ये ३५ लिटर दारु अशी एकुण ६६५ लिटर दारू तसेच २,००,०००/- रु. किंमतीचा तिन चाकी पॅगो टेम्पो गाडी क्र. एम.एच / १४ / जे.पी / १३५३ असलेला असा एकुण २,९८,५२५/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो आरोपी अरबाज नजीर सय्यद (वय २६ वर्षे रा. गल्ली नं.१७, सय्यदनगर, हडपसर, पुणे) याचे ताब्यातून जप्त करण्यात आला आहे.

संबंधित कारवाई अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, सह पोलिस आयुक्त, मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, आर. राजा, पोलिस उप-आयुक्त परि. ०५, धन्यकुमार गोडसे, सहा. पोलिस आयुक्त, वानवडी विभाग, विनय पाटणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन, मानसिंग पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे कोंढवा पोलिस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलिस उप-निरीक्षक बालाजी डिगोळे, सपोनि लेखाजी शिंदे, मपोउपनि स्नेहल जाधव, पोलिस हवालदार सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, पोलिस अंमलदार सुरज शुक्ला, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, सुजित मदन, सागर भोसले यांच्या पथकाने केली आहे.

Video: पुणे शहरात भर पावसात महिला पोलिस अधिकाऱ्याकडून वाहतूक नियंत्रण…

पुणे शहरात वॉचनमचा खुनाचा प्रयत्न करणारे दोघे २४ तासांत अटक…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाला नवं वळण; आणखी दोघांना अटक…

पुणे शहरातील गणेशोत्सवासाठी पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय…

पुणे शहरात चोरट्यांनी केला पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वसंरक्षणार्थ गोळीबार…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!