पत्नीने केला नवऱ्याचा हॉटेलपर्यंत पाठलाग अन् दोन युवतींसोबत…

भुवनेश्वर (ओडिशा) : पत्नीने एका हॉटेलच्या रूममध्ये पतीला दोन युवतींसोबत रंगेहात पकडल्यानंतर एकच गोंधळ उडाला. नवरा आणि दोन्ही मुलींना इन्फोसिटी पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

पत्नीला नवऱ्यावर संशय होता. एक दिवस पत्नी पाठलाग करत हॉटेलमध्ये पोहोचली होती. पीडित पत्नीने इन्फोसिटी पोलिसांशी संपर्क साधून पतीच्या कृत्यांची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर महिला आणि पोलिसांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला. आरोपी ज्या खोलीत उपस्थित होता तिथे पोहोचले आणि दरवाजा ठोठावला. आरोपीला बाहेर पोलिस आल्याचे समजले. बराच वेळ त्याने दरवाजा उघडला नाही. हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना मदत करत खोलीचा दरवाजा उघडला.

पोलिस जेव्हा खोलीत पोहोचले तेव्हा टेबलवर अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळल्या, ज्यात दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटं आणि उघडलेले कंडोमचे पाकीट होते. पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले आहे. खोलीत सापडलेल्या दोन मुलींचीही चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे प्रकरण भुवनेश्वरच्या पटिया भागातील एका हॉटेलशी संबंधित आहे. याप्रकरणी इन्फोसिटी पोलिस तपास करत आहेत. पत्नीला पतीच्या हालचालींवर संशय आल्याने हे प्रकरण उघडकीस आले आहे.

पोलिसांनी संपूर्ण खोलीची तपासणी केली असता त्यांना दोन मुली बाथरूममध्ये लपलेल्या दिसल्या. महिला पोलिसाने त्यांना बाहेर काढले. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने सांगितले की, तो शूटिंगबाबत चर्चा करण्यासाठीच तिथे आला होता आणि त्याच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! मामीसोबत प्रेमसंबध असल्याचे पत्नीला समजले अन्…

Video: महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत नवऱ्याला रंगेहात पकडले अन्…

नवऱ्यासोबत मैत्रिणीला रंगेहात पकडल्यावर मैत्रिणीला गेटला बांधले अन्…

सातारामध्ये मित्रासोबत लॉजवर जाताना रंगेहाथ पकडले अन्…

नात्याचा शेवट! अल्पवयीन दीर आणि वहिनीला रंगेहाथ पडकले…

Video: नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये रंगेहात पकडलं अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!