मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन…

मुंबई : प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास निधन झाले. एक ते दीड वर्षांपासून ते कर्करोगाशी सामना करत होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र कर्करोगाशी त्यांची झुंज अपयशी ठरली. विजय कदम यांच्या पार्थिवावर आज (शनिवार) दुपारी 2 वाजता अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

विजय कदम यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भुमिका निभावल्या होत्या. त्यांच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 1980-90च्या दशकात विजय कदम यांनी अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले. विजय कदम त्यांच्या अष्टपैलू अभिनय क्षमतेसाठी ओळखले जात असे, त्यांनी गंभीर भूमिकांप्रमाणेच विनोदी भूमिकाही केल्या. त्या मोठ्या प्रमाणावर गाजल्या. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. मराठीतील एक हरहुन्नरी अभिनेता अशी त्यांची ओळख होती.

दरम्यान, मराठी चित्रपट, मालिकांबरोबरच विजय कदम यांनी मराठी रंगभूमी देखील गाजवली. अनेक हिट मालिकांमध्ये त्यांनी काम केले. टूरटूर, सही दे सही, विच्छा माझी पुरी करा, पप्पा सांगा कुणाचे ही त्यांची अत्यंत गाजलेली नाटकं आहेत. ती परत आलीये ही त्यांची शेवटची मालिका ठरली. या मालिकेत त्यांनी बाबुराव तांडेल ही भुमिका साकारली होती. या मालिकेत अनेक वर्षांनी विजय कदम प्रेक्षकांसमोर आले होते.

अभिनेत्रीच्या अपघाती मृत्यूनंतर अभिनेत्याची आत्महत्या…

प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू…

‘कुमकुम भाग्य’फेम अभिनेत्रीनेही घेतला जगाचा निरोप…

‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याच्या भावाने केली आत्महत्या…

लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बंधू अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!