नाशिक पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला केले जेरबंद…

नाशिकः मोबाईल चोरी करणारी आंध्रप्रदेश व तामिळनाडू येथील आंतरराज्यीय टोळीकडून चोरीचे २२ मोबाईल हस्तगत करण्यात गुन्हेशाखा युनिट क्र. १ला यश आले आहे. नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

नाशिक शहरामध्ये वारंवार वेगवेगळया परिसरातील रहीवाशी वस्ती, बाजारपेठांमधुन नागरिकांचे मोबाईल चोरी च्या घटना नेहमी घडत असल्याने सदर घटनांच्या अनुषंगाने आरोपीतांचा शोध व्हावा या दृष्टीने पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी सुचना दिल्या होत्या. त्या अनुषगांने प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त (गुन्हे), संदिप मिटके, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते.

पंचवटी येथील तेजश्री अपार्टमेंट मधील एकाच फ्लॅट मधून ०५/०६/२०२४ रोजी सकाळी ०७:०० वाजेच्या सुमारास ५ मोबाईल फोन चोरी झाले होते. त्या बाबत पंचवटी पोलिस ठाणे गु.र.नं. ३५५ / २०२४ भा.द.वि. कलम ३८०, ३४ प्रमाणे दाखल झाला होता. त्याअनुषंगाने नाशिक शहरात प्रतिबंधात्मक गस्त करीत असताना ०६/०६/२०२४ रोजी गुन्हेशाखा युनिट ०१ कडील पोउनि / रविंद्र बागुल यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, आंध्रप्रदेश व तामीळनाडू येथील मोबाईल व लॅपटॉप चोरी करणारी टोळी नाशिक शहरात आली आहे. सध्या ते देवळाली गाव परिसरात राहत असुन तीन इसम हे चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी सुभाष रोड,
वाघचौक नाशिकरोड, येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली, सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट -१ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना देवून त्यांनी सपोनि / हेमंत तोडकर, पोउनि / रविंद्र बागुल, पो.हवा./ प्रविण वाघमारे, विशाल काठे, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, शरद सोनवणे, नाझीम पठाण, पो.ना / विशाल देवरे, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, समाधान पवार यांचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून रवाना केले.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पोलिसांच्या पथकाने सुभाष रोड, वाघ चौक नाशिक रोड, येथे सापळा लावून मिळालेल्या बातमी प्रमाणे ०३ जणांना ताब्यात घेवून त्यांचे कडे विचारपुस करता त्यांनी त्यांची नावे
१) इंद्रा डुमप्पा, रा. १ – २३ बोडगुटपल्ली, कोटामंडल, जि. चित्तुर राज्य आंधप्रदेश,
२) बालाजी सुब्रमणी, रा. ५०२, उदया राजपालम, थोटामल जि. त्रिपथुर राज्य तामीळनाडु,
३) दुर्गेश कृष्णमुर्ती, रा. बोडीगुटटला पाले, व्यंकटगिरी कोटटा, जि. चित्तुर राज्य आंध्रप्रदेश असे सांगुन त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. त्यावरून
पंचवटी पोलिस ठाणे गुरनं ३५५ / २०२४ भादवि कलम ३८० प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपींकडून विविध ठिकाणावरून चोरलेले २,३८,२००/-रूपये किंमतीचे एकुण २२ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सदर इसमांना जप्त मुददेमालासह पुढील कारवाई कामी पंचवटी पोलिस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपी पकडले गेल्या मुळे नाशिक शहरात होणा-या संभाव्य मोबाईल व लॅपटॉप चोरीस प्रतिबंध करण्यात यश आले आहे.

सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलिस उप-आयुक्त (गुन्हे), संदिप मिटके, सहा. पोलिस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील वरीष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सपोनि / हेमंत तोडकर, पोउनि / रविंद्र बागुल, पो.हवा./ प्रविण वाघमारे, विशाल काठे, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, शरद सोनवणे, नाझीम पठाण, महेश साळुंके, पोना / विशाल देवरे, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, समाधान पवार यांनी संयुक्त रित्या केलेली आहे.

नाशिक शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने भुसावळमधील दुहेरी हत्याकांडातील आरोपीला ठोकल्या बेड्या…

नाशिक पोलिसांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची काढली वरात…

नाशिकमध्ये सराफाच्या घरात फर्निचर फोडताच मिळालं भलं मोठं घबाड….

नाशिकमध्ये महिनाभरात लाखो रुपयांचा गुटखा जप्त; टवाळखोरांवर कारवाई…

नाशिक! गंगापूर पोलिसांनी दुचाकीचा गुन्हा 24 तासात केला उघड…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!