
भीषण अपघात! वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात; 13 जणांचा मृत्यू…
भोपाळ (मध्य प्रदेश) : राजस्थानमधून लग्नाचे वऱ्हाड राजगढ जिल्ह्यातल्या कुलामपुरा गावात येण्यासाठी निघाले होते. मात्र, वाटेतच वऱ्हाडाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मध्य प्रदेशच्या राजगढमध्ये भीषण अपघात झाला आहे. राजस्थानमधून लग्नाचं वऱ्हाड रविवारी (ता. २) रात्री राजगढ जिल्ह्यातल्या कुलामपुरा गावात येण्यासाठी निघाले होते. पिपलोदी परिसरात ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातामध्ये वाहनाखाली दबून तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ट्रॅक्टरच्या ट्रॅलीमध्ये एकूण 25 प्रवासी होते. प्रवासादरम्यान त्यांची मजा मस्ती सुरू होती. ट्रॅक्टरने मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यात प्रवेश करताच पिपलोदी परिसरात चालकाचे वाहनावरचे नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला. ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली दबल्यामुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉक्टरांचं पथक घटनास्थळी बोलावण्यात आले, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

भीषण अपघात! सांगलीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू; पाहा नावे….
गुजरातमध्ये गेम झोनमध्ये भीषण आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू…
शिक्षक आमदारच्या कुटुंबियांच्या गाडीचा भीषण अपघात; 6 ठार…
नाशिकमध्ये एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात, 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

