
सीआरपीएफच्या हेड कॉन्स्टेबलचा तस्करीमध्ये समावेश; पाच जणांना अटक…
रामपूर (उत्तर प्रदेश): सोने तस्करांकडून सोनं लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, धक्कादायक म्हणजे आरोपीच्या साथीदारांमध्ये एका सीआरपीएफच्या हेड कॉन्स्टेबलचा देखील समावेश आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी या प्रकरणात सीआरपीएफच्या या कर्मचाऱ्यासह एकूण पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 36 लाख रुपयांचे सोने आणि 13 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
रामपूरचे पोलिस अधिकारी राजेश द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांकडून तपासणी सुरू असताना एका भरधाव वेगात मोटार आली होती. मोटारीला आम्ही थांबण्यास सांगितल असता वाहचालकाने कार न थांबवता वेग वाढवून पुढे नेली. मात्र, पुढे ती कार धडकली. यानंतर कारमध्ये असलेल्यांनी आमच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तर म्हणून आम्ही देखील गोळीबार केला. दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. या घटनेत एक आरोपी जखमी झाला. या गाडीमधून तिंघाना अटक करण्यात आली.
पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी आपल्या अन्य साथिदारांची नावे देखील सांगितली. ज्यामध्ये एका सीआरपीएफच्या हेड कॉन्स्टेबलचा देखील समावेश होता. त्याच्यासह पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. आरोपींनी सांगितलं की ते बॉर्डवरून जे सोन्याची तस्करी करायचे त्यांना लुटायचे. हेच लुटलेलं सोनं विक्री करण्यासाठी ते चालले होते. पोलिसांनी त्यांच्याकडून 36 लाख रुपयांचे सोनं आणि 13 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

