
माजी आमदाराच्या मुलीवर बलात्कार, फोटोही काढले अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : माजी आमदाराच्या विवाहित मुलीवर बलात्काराची घटना घडली असून, अश्लील फोटोही काढले आहेत. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून अनेकदा लैंगिक शोषण करण्यात आले. पीडितेला ब्लॅकमेल करत तिच्याकडून तब्बल तीन कोटी रुपये उकळण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
पीडित महिलेने आसिफ अली नावाच्या व्यक्तीसह चौघांवर बलात्काराचा आरोप केला आहे. पीडित महिला उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या माजी आमदाराची विवाहित मुलगी आहे. महिलेचा पती व्यवसायिक आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत पीडितेने म्हटले की, ‘माझ्या वडिलांचे २०२३ मध्ये आजाराने निधन झाले आहे. त्याआधी वडिलांच्या देखभालीसाठी कानपूरला येणे जाणे होत असे. भाऊ नसल्याने त्यांची जबाबदारी माझ्यावर होती. तेव्हा हा प्रकार घडला आहे.
वडिलांच्या घरी आसिफ अली नेहमी यायचा. एप्रिल २०१९ मध्ये पीडिता वडिलांकडे असताना आसिफ अलीने कोल्ड्रिंकमध्ये अंमली पदार्थ टाकून प्यायला दिले होते. त्यानंतर बेशुद्ध पडल्यानंतर बलात्कार केला. शिवाय, त्याने अश्लील फोटोही काढले होते. आरोपीने महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत काही कागदपत्रांवर सह्या घेतल्या. वेळोवेळी ३ कोटी रुपये उकळले. शिवाय, आरोपी एसिड हल्ल्याची धमकी देत आहे.
दरम्यान, पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी असिफ अलीसह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेचे वडील समाजवादी पार्टीचे माजी आमदार होते. तर आरोपीसुद्धा पक्षाचा पदाधिकारी होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.
धक्कादायक! पोलिस व्हॅनमध्येच दोन कैद्यांनी केला महिलेवर बलात्कार…
संतापजनक! युवतीच्या आईला हॉट्सऍपवरून पाठवला बलात्काराचा व्हिडिओ…
स्पॅनिश महिलेने सांगितली सामूहिक बलात्काराची थरारक घटना…
शासकीय ठेकेदाराचा महिलेवर ऑफिसमध्येच केला बलात्कार; शिवाय…
विवाहीत युवकावर तिघांनी शेतामध्ये केला सामुहिक बलात्कार…

