नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने सप्तश्रृंगी गडावरून उडी घेत संपवले जीवन…

नाशिक : नाशिकमध्ये सप्तश्रृंगी गडावरील शीतकड्यावरून ४०० फूट खोल दरीत उडी मारून प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सात दिवसांपासून दोघेही बेपत्ता होते. कड्याच्या खाली एका झाडावर मुलीचा मृतदेह अडकला होता तर तरुणाचा मृतदेह खाली पायथ्याला पडला होता.

मंगेश राजाराम शिंदे (वय २४) आणि प्रियांका संतोष तिडके (वय १६) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. मंगशे आणि प्रियांका दुचाकीवरून २८ एप्रिलला सप्तश्रृंगी गडावर आले होते. दोघांनी सप्तश्रृंगी गडावर शीतकडा इथून उडी मारून आत्महत्या केली. बेपत्ता झाल्यानंतर आठवड्याभराने प्रेमीयुगुलाचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. गडाच्या पायथ्याला असणाऱ्या भातोडे इथल्या गुराख्यांनी याची माहिती पोलिस पाटील विजय चव्हाण यांना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह दरीतून बाहेर काढले. मृतदेह कुजले असल्याने जागीच शवविच्छेदन करण्यात आले.

मंगेश आणि प्रियांका यांचे एकमेकांवर प्रेम होते, अशी माहिती समोर आली आहे. ते २८ एप्रिलपासून बेपत्ता होते. दोघांचे मृतदेह आढळल्यानंतर त्यांच्याजवळ असलेल्या साहित्यावरून त्यांची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करत आहेत.

मेव्हणी आणि दाजीचे प्रेमसंबंध अन् महिन्यातच नवऱ्याचा खून…

प्रेमाची सैराट कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह अन् पुढे…

त्रिकोणी प्रेमकथा! मुलीचे एकाच वेळी दोघांशी प्रेमसंबध अन् पुढे…

एकतर्फी प्रेमातून नगरसेवकाच्या मुलीची कॉलेजमध्ये हत्या…

हृदयद्रावक! लग्न करायला निघालेल्या प्रेमीयुगुलाचा वाटेतच अंत…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!