
विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
विक्रांत देशमुख हे गेल्या १४ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत असून, पुणे शहरात सध्या ते पोलिस उपायुक्त म्हणून काम पाहत आहेत. शेतकरी कुटुंबातील जन्म आणि कुटुंबाला पोलिस दलाचा कोणताही वारसा नसताना त्यांनी अभ्यासाच्या जोरावर अधिकारीपदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या वाटचालीविषयी थोडक्यात…
विक्रांत देशमुख यांचे शिक्षण पिंपरी-चिंचवड येथे झाले. शिक्षणात पहिल्यापासूनच हुशार. शेतकरी कुटुंब, कामगाराचा मुलगा आणि वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जिद्दीने अभ्यास करून ते चांगले गुण मिळवत. दहावी, बारावीमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर बीएस्सी अॅग्री केले. पण, स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे होते. मोठ्या जिद्दीने अभ्यास करून यशाला गवसणी घातली आणि वडिलांचे स्वप्न साकार केले.
वडिलांची प्रेरणा…
एक सर्वसामान्य कुटुंबात जन्म. वडील एका कंपनीत कामाला. जेमतेम पगार. आपल्या मुलाने अधिकारी व्हावे, ही इच्छा ते नेहमी बोलून दाखवत. अभ्यासात हुशार असल्यामुळे फार काही अवघड नव्हते. पण, ध्येय समोर असल्यामुळे त्या दिशेने वाटचाल सुरू होती. वडिलांकडून मोठी प्रेरणा घेत विक्रांत देशमुख हे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले आणि कुटुंबाला मोठा आनंद झाला.
सायकलवरून प्रवास…
पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात शिक्षण सुरू असताना त्यांनी रेल्वे आणि सायकलवरून प्रवास केला आहे. सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थी परिस्थितीनुसार जीवन जगत असतात. अगदी त्याचप्रमाणे विक्रांत देशमुख सुद्धा सर्वसाधारण परिस्थितीमधून पुढे गेले आहेत. परिस्थितीची जाणीव असल्यामुळे अधिकारी झाल्यानंतरही सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे ते काम करतात.
पहिला मोबाईल…
जीवनात ध्येय ठरलेले असेल आणि ते गाठायचे असेल तर संघर्ष हा करावाच लागतो. ध्येय पूर्ण करण्यासाठी अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. पण, कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर यश प्राप्त होतेच. विक्रांत देशमुख यांच्याकडे पहिला मोबाईल कधी आला असेल तर तो स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर. मोबाईल नसल्यामुळे त्यांचे काहीही अडून राहिले नव्हते. कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासाठी कॉइन बॉक्सचा वापर करत. मोबाईल जवळ नसल्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित झाले होते. बहुतांश वेळ अभ्यास आणि अधिकारी होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू होती. अखेर, स्वप्न साकार झाल्यानंतर पहिला मोबाईल घेतला. अधिकारी झाल्यानंतरही फक्त कामापुरताच मोबाईलचा वापर करताना दिसतात. मोबाईलपेक्षा काम महत्त्वाचे आहे, हे त्यांचे स्पष्ट मत आहे.
मित्रांचा ग्रुप बनला अधिकारी…
एखाद्या मुलाचा अथवा मुलीचा मित्र परिवार कसा आहे, यावरून त्यांची पुढे जडणघडण होत असते. प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र-मैत्रिणींचा वाटा खूप महत्त्वाचा असतो. पण, एखाद्या ग्रुपचे ध्येय मोठे असेल तर नक्कीच त्याचा फायदा सर्वांनाच होत असतो. विक्रांत देशमुख यांचा दहा जणांचा ग्रुप होता. एकत्र अभ्यास करून विचारविनिमय करत. एकमेकांचे प्रश्न सोडवत. दहाच्या दहा मित्रांनी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर दहाच्या दहा मित्र अधिकारी बनले आहेत.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन पुस्तक खरेदी करा…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

