घाटंजी तालुक्यातील जांब येथे तालुका विधी सेवा शिबिर…

घाटंजी/यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील जांब येथील शासकीय आश्रम शाळा येथे 29 मार्च 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005, बाल विवाह प्रतिबंध कायदा 2006, शिक्षण व अन्नाचा अधिकार, प्रदुषणमुक्त पाणी व हवेचा अधिकार तसेच पाणी सन्मान आणि संवर्धन या विविध विषयांवर घाटंजी तालुका विधी सेवा समितीच्या शिबिरात उपस्थित राहण्याचे आवाहन घाटंजी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात यांनी केले आहे.

घाटंजी तालुक्यातील जांब परिसरातील नागरिकांनी कळविण्यात येते की, घाटंजी तालुका विधी सेवा समितीच्या वतीने 29 मार्च 2024 रोजी कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005, बाल विवाह प्रतिबंध कायदा 2006, शिक्षण व अन्नाचा अधिकार, प्रदुषणमुक्त पाणी व हवेचा अधिकार तसेच पाणी सन्मान आणि संवर्धन या विविध विषयांवर घाटंजी तालुका विधी सेवा समितीचे वतीने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या शिबिरात घाटंजी न्यायालयातील कोर्ट क्रमांक 1 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात, कोर्ट क्रमांक 2 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर आदीं न्यायाधीश उपस्थित राहुन सदर शिबिरात मार्गदर्शन करणार आहे. तसेच घाटंजी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अनंतकुमार पांडे, सचिव ॲड. सादीक खान या सह अनेक ज्येष्ठ अधिवक्ता या शिबिरात उपस्थित राहणार आहे. तरी घाटंजी तालुका विधी सेवा समितीच्या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहुन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाबाबत अध्यक्ष विधीज्ञ संघ घाटंजी, ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे घाटंजी, ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे पारवा, गट विकास अधिकारी पंचायत समिती घाटंजी, मुख्याध्यापक शासकीय आश्रम शाळा जांब आदींना कळविण्यात आले आहे.

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!