येरवडा पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या टोळीला केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात शटर उचकटून घरफोडी करणारी टोळीला येरवडा तपास पथकाने जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

येरवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तपास पथकाचे पोहवा अमजद शेख, तुषार खराडे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, प्रशांत कांबळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ओंकार सुपर मार्केट व हर्म्स हेरिटेज येरवडा येथे चोरी करणारे संशयीत आरोपी हे वाडिया बंगला नगर पुणे रोड व ब्रम्हासनसिटी वडगाव शेरी येथे उभे आहेत. याबाबतची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक येरवडा पोलिस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथक अधिकारी पोलिस उप-निरीक्षक स्वप्निल पाटिल व अंमलदार पोहवा अमजद शेख, तुषार खराडे, कैलास डुकरे, पोअं अनिल शिंदे, सुरज ओंबासे, प्रशांत कांबळे, विठ्ठल घुले यांनी तेथे जावून संशयीत इसमांना पळून जात
असताना पकडले. त्यांना ताब्यात घेवून नाव पत्ता विचारता
१. तौसिफ बशीर शेख वय २५ वर्षे रा कोंढवा पुणे
२. अमोल किसन अवचरे वय २८ वर्षे रा कासेवाडी भवानी पेठ पुणे
३. आजिम सलिम शेख वय २४ वर्षे रा कासेवाडी भवानीपेठ पुणे
४. प्रथमेश उर्फ पत्या प्रमोद कांबळे वय २४ वर्षे रा कासेवाडी भवानी पेठ पुणे असल्याचे सांगितले.

आरोपींकडे चौकशी करता त्यांनी येरवडा परिसरात चोरी केल्याने येरवडा पो स्टे गु र नं २७ / २०२४ भादवि ४५७,३८० व गु र नं १०४ / २०२४ भादवि ४५४, ४५७, ३८० हे गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर आरोपींना ०४/०३/२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे. पोलिस कस्टडीमध्ये तपासादरम्यान त्यांनी स्वारगेट, कोंढवा परिसरात चोरी केल्याचे सांगितले. त्यावरुन संबंधित पोलिस स्टेशन अभिलेखावरील दुकानाचे शटर उचकटून केलेले खालील गुन्हे केल्याचे कबूल केल्याने उघडकीस आलेले आहेत. सदर आरोपींकडून खालील एकूण ४ गुन्हे उघडकीस आलेले असून एकूण ७८,९००/- रु किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने त्यामध्ये ४.६ ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे ३० कॉईन व सोन्याचे ३ कॉईन व ४१,५००/- रोख रक्कम, ९५३२/- रू किंमतीचे किराणा सामान, ३०,०००/- रु किंमतीची मोटारसायकल असा एकूण १,५९,९३२ रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

धक्कादायक! पुणे शहरात छेडछाडीला कंटाळून युवतीने घेतले पेटवून…

पुणे जिल्ह्यात हॉटेलमध्ये बसलेल्या व्यक्तीवर तिघांकडून गोळीबार…

येरवडा पोलिसांनी मोक्कातील पाहिजे आरोपीला केले जेरबंद…

दुहेरी खुनातील पाहिजे आरोपीला येरवडा पोलिसांनी केले जेरंबद…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!