
मेहुणीने केलेला इशारा दाजीला पडला महागात…
आग्रा (उत्तर प्रदेश): एका व्यक्तीला आपल्याच मेहुणीने केलेला इशरा महागात पडला आहे. मेहुणीसोबत डान्स करताना पाहून त्या व्यक्तीच्या पत्नीने सर्वांसमोरच नवऱ्याला चपलेने मारहाण केली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दाम्पत्य आपल्या एका नातेवाईकाकडे लग्नात गेले होते. याठिकाणी डीजेवर त्या व्यक्तीची मेहुणी डान्स करत होती. मेहुणीने आपल्यासोबत डान्स करण्यासाठी दाजीला इशारा केला. मेहुणीने बोलावल्याने त्याने तिला नकार न देता तो तिथे तिच्यासोबत आला आणि डान्स करू लागला. मात्र, हा सर्व प्रकार पाहून त्या व्यक्तीच्या पत्नीला खूप राग आला आणि तिने त्या सर्वांसमोर त्या व्यक्तीला चपलीने मारहाण केली. या घटनेनंतर लग्नात शांतता पसरली. नेमकं काय झालं, पत्नीने आपल्या पतीला चपलेने का मारहाण केली, हे नातेवाईकांना कळत नव्हते.
आग्रा पोलिस लाइनमध्ये चालणाऱ्या कौटुंबिक समुपदेशन केंद्र येथे ही घटना घडली आहे. पत्नीच्या या कृतीनंतर पतीला खूप लाज वाटली आणि तो तिथून निघून गेला. पण, चर्चेला उधाण आले होते.
पुणे शहरात बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीची हत्या करून मेव्हण्याची आत्महत्या…
बहिणीच्या पतीची म्हणजेच दाजीची शुल्लक वादातून केली हत्या…
प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…
छत्रपती संभाजीनगर हादरलं! अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार…
प्रेमविवाहानंतर तिसऱ्याच महिन्यात घडली धक्कादायक घटना…

