
बार्शी पोलिस स्टेशन समोरील चप्पल दुकानास अचानक आग…
बार्शी (आकाश वायचळ): सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील बस स्थानकाजवळील आणि शहर पोलिस स्टेशन समोरील चप्पल दुकानास अचानक आग लागली. या आगीत दुकान जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवत हानी झालेली नाही.
बार्शी शहर पोलिस स्टेशन समोरील शुभम चप्पल मार्ट या दुकानास रात्री 10 : 00 वाजताच्या सुमारास आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी अग्निशमन दलास पाचरण केले होते. त्यानंतर, अग्निशमन विभागाने तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून नागेश कबाडे यांच्या मालकीचे हे दुकान आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाडीने तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. पुढील तपास सुरू आहे.
बार्शी-धाराशिव रस्त्यावर पुन्हा अपघात; युवकाचा जागीच मृत्यू…
बार्शी-धाराशिव मार्गावर भीषण अपघात; तिघा मित्रांचा जागीच मृत्यू…
बार्शी पोलिसांनी ४८ तासांत उघड केला चोरीचा तपास…
तुळजापूरला देवदर्शनाला निघालेल्या चार मित्रांचा जागीच मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

