मित्राने गुप्तांगावर हाताचा कोपरा मारला अन् गेला जीव…

नाशिक : मित्र-मित्र मस्ती करत असताना एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या प्रायव्हेट पार्टवर हाताचा कोपरा मारला आणि त्यानंतर त्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

लवनीत भगवाने (वय १५) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. मित्राने चेष्टामस्करीत गुरुवारी (ता. ७) गुप्तांगावर हाताचा कोपरा मारला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अल्पवयीन मुलावर याप्रकरणी खुनाचा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी मुलाला देवळाली कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रशांत झिनवाल याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 7 मार्चला रात्री 9 वाजताच्या सुमारास देवळाली कॅम्पमधील फिल्ट्रेशन प्लँटजवळ तो मोबाईलवर खेळत होता. तेव्हा त्याच्यासमोरून सोन्या, मोहित, सुमीत, लवनीत हे चार तरुण गेले. सुमीत आणि लवनीत यांच्यात मजामस्ती सुरू होती. लवनीत याने आधी सुमीतला डोक्यात मारले. यानंतर सुमीतने लवनीतच्या पोटात दोन बुक्के मारून त्याला खाली पाडले आणि त्याच्या गुप्तागांवर हाताचा कोपर मारला. लवनीत तिथेच बेशुद्ध झाला. मोहित आणि सुमीतने त्याला रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, लवनीतला सुमीतने मारल्याने झालेल्या दुखापतीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देऊ; नाशिक पोलिसांना धमकीचा फोन…

नाशिक शहरात युनिट १ची मोठी कामगिरी; अपहरणकर्त्यांची २४ तासांत सुटका…

नाशिकमध्ये पानटपरी चालकांवर विशेष मोहिम राबवून कारवाई…

नाशिक पोलिसांनी बहेनवाल गँगच्या म्होरक्यासह तीन आरोपींना दिल्लीमधून केली अटक…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!