नाशिकमध्ये पोलिस ठाण्यातच पोलिसकाकाची आत्महत्या…

नाशिक: नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (मंगळवार) सकाळी घडली आहे. पोलिस निरीक्षक अशोक नजन (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या पोलिसकाकाचे नाव आहे.

अंबड पोलिस ठाण्यात स्वतःच्या कॅबीनमध्ये आज सकाळी पोलिस निरीक्षक अशोक नजन यांनी स्वतःच्या पिस्तूलमधून डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली. यामुळे नाशिक पोलिस दलात खळबळ उडाली आहे. त्यांचे आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या वर्षभरापासून अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून अशोक नजन काम करत होते. अतिशय शांत व सोज्वळ स्वभावाचे असलेले नजन यांनी आपल्या कामातून वचक निर्माण केला होता.

पोलिस निरीक्षक अशोक नजन आज सकाळी दहा वाजेच्या दरम्यान ते त्यांच्या कॅबिनमध्ये बसलेले होते. तेव्हा त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे नेण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसकाकाचा मृत्यू…

मुंबई पोलिस दलातील पोलिसकाकाने घेतला टोकाचा निर्णय…

पोलिसकाकाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू…

मुंबई पोलिसकाकाचा चाळीसगावात क्रिकेटच्या वादातून खून…

पुणे जिल्ह्यातील पोलिसकाकाचा हृदयविकाराने मृत्यू….

हृदयद्रावक! पोलिसकाकाचा मांजाने चिरला गळा…

पोलिसकाकाचा लष्करी वाहनाच्या धडकेत मृत्यू; ‘बोला प्रभू’ आवाज हरपला…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!