
Video: नाशिकमध्ये ३४व्या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचा समारोप!
नाशिक : महाराष्ट्र पोलिस दल हे देशातील सर्वोत्तम पोलिस दल असून, पोलिस दलाचा इतिहास गौरवशाली आहे. एखाद्या पोलिसाकडून चुकीचे कृत्य घडले तर पोलिस दलाला टीकेला सामोरे जावे लागते. पोलिसांनी अशावेळी आपली शपथ निभवण्यासाठी आपले पोलिस दल समाजभिमुख कसे होईल, यासाठी योगदान द्यावे. शासक नव्हे तर जनसेवक म्हणून पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये सुरू असलेल्या ३४व्या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेच्या समारोपप्रसंगी शनिवारी (ता. १०) प्रमुख अतिथी म्हणून फडणवीस उपस्थित होते. नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. यावेळी राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार ॲड राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य राखीव पोलिस दलाचे अपर पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसाद, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अपर पोलिस महासंचालक निखील गुप्ता, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक दत्ता कराळे, पोलिस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने आदी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘क्रीडा स्पर्धा ही अत्यंत उत्तम व यशस्वीरित्या पार पडली. स्पर्धेत राज्यातील पोलिस दलाचे विविध खेळाडूंनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या क्रीडाकौशल्याने मैदान गाजविले. अशा स्पर्धांमधून देशाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू मिळतात. महाराष्ट्र पोलिस दलात असे अनेक पोलिस खेळाडू आहेत, ज्यांच्यामध्ये क्षमता आहे. ज्या खेळाडूंनी विजयश्री मिळविला त्यांनी पुढे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविण्यासाठी जोरदार तयारी करावी.’
महाराष्ट्र पोलिसांच्या वार्षिक क्रीडा कार्यक्रम #MSPG2024 चा समारोप आणि पुरस्कार वितरण सोहळा आदरणीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री (महाराष्ट्र राज्य ) श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते संपन्न झाला..!
Our sincerest thank you to Hon. DCM & HM, MS for your gracious presence, for… pic.twitter.com/0fe1tZtyoF
— नाशिक शहर पोलीस – Nashik City Police (@nashikpolice) February 11, 2024
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ताणतणावापासून दूर राहण्यासाठी खेळ महत्वपूर्ण आहेत. खेळामुळे एक संघ भावना तयार होवून आव्हाने पेलण्याची स्फूर्ती व शक्ती मिळत असल्याने खेळाडू प्रत्येक क्षेत्रात आपली चमक दाखवत असतो. यासारख्या क्रीडा स्पर्धांमुळे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळत असते. रेकॉर्डस हे तोडण्यासाठी असतात, अशा स्पर्धांमधील रेकॉर्डस् तोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. या स्पर्धांच्या माध्यमांतून राज्यातील पोलिस दल एक नवा जोश व उत्साह घेऊन जाईल. महाराष्ट्र राज्याचे पोलिस दल देशातील सर्वोत्तम पोलिस दल असून ते आपले कर्तव्य निर्भीड व निस्पृहपणे बजावतात. त्याचप्रमाणे पोलिसांच्या कल्याणासाठी चांगली दर्जेदार घरे उपलब्ध करून देणे, कुटुंबीयांना आरोग्य, शिक्षणाच्या योजना देण्यासाठी शासन सदैव कटिबध्द असल्याचे सांगत, नव्या पिढीसमोर असलेले अंमली पदार्थांच्या मोठ्या आव्हानाचा सामना करण्यासाठी झिरो टॉलरन्सच्या माध्यमातून ही लढाई जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला.’ पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला मार्गदर्शन करतांना म्हणाल्या, ‘क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उत्तम आरोग्य राखण्यासाठी मदत होत असते.’
दरम्यान, यावेळी कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेले पोलिस पथकांच्या संचलनाने करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. तसेच पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी उपस्थित मान्यवरांना स्मृतिचिन्ह देवून सन्मानित केले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 34 व्या राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धांचा समारोप झाल्याचे जाहीर केले. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
Latest OVERALL CHAMPIONSHIP CHART..🏅..!
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे सध्या सुरू असलेल्या ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२४(४ – १० फेब्रुवारी २०२४) च्या ७व्या दिवसाचा चॅम्पियनशिप चार्ट ..
🏆 New Record set in Athletics Meet today..
-3000M STEEPLECHASE-… pic.twitter.com/TKpWfOpe45
— नाशिक शहर पोलीस – Nashik City Police (@nashikpolice) February 10, 2024
क्रीडा स्पर्धांचे निकाल…
कुस्ती क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक विजेते: सहाय्यक पोलिस आयुक्त नरसिंग यादव, सहाय्यक समादेशक राहुल आवरे, पोलिस उप अधीक्षक विजय चौधरी.
बॉडीबिल्डिंग मध्ये रौप्य व कांस्य पदक विजेते: सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी, पोलिस उपनिरीक्षक सचिन शिंदे
हॉकी विजेता संघ : प्रशिक्षण संचालनालय
फुटबॉल विजेता संघ : राज्य राखीव पोलिस बल
महिला संघ : ऑल ओव्हर जनरल चॅम्पियनशीप : वीर जिजामाता शिल्ड – प्रशिक्षण संचालनालय संघ पहिल्या रँकवर तर मुंबई शहर (द्वितीय), पुणे आणि पिंपरी चिंचवड (तृतीय), कोल्हापूर रेंज (चौथा), नागपूर शहर (पाचव्या), अमरावती रेंज (सहाव्या)
व्हॉलीबॉल: नागपूर शहर, कबड्डी : पुणे शहर/ पिंप्री चिंचवड आयुक्तालय
पुरूष संघ : कबड्डी : मुंबई शहर, बास्केटबॉल : नाशिक परिक्षेत्र, खो – खो व हँडबॉल : मुंबई शहर, ॲथलेटिक्स : प्रशिक्षण संचालनालय,
उत्कृष्ट नेमबाज (पुरुष) : वाशिम पोलिस अधीक्षक अनुज तारे
ऑल ओव्हर जनरल चॅम्पियनशीप : राज्य राखीव पोलिस बल (प्रथम), प्रशिक्षण संचालनालय संघ (द्वितीय), मुंबई शहर (तृतीय), कोल्हापूर रेंज (चौथ्या), पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड (पाचव्या) तर नाशिक रेंज (सहाव्या).
नाशिकमध्ये पोलिस क्रीडा स्पर्धेला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; संदीप कर्णिक यांच्याकडून उत्तम नियोजन…
नाशिकमध्ये राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न: संदिप कर्णिक
नाशिकमध्ये राज्य पोलिस क्रीडा स्पर्धांना प्रारंभ : संदिप कर्णिक
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यामुळे बास्केटबॉल मैदानाचा शुभारंभ!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

