गँगस्टर शरद मोहोळच्या पत्नीला पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या…

पुणे: गँगस्टर शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकर याच्या नावाने स्वाती मोहोळ यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुन्ना पोळेकरच्या नावाने अकाऊंट बनवत स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. स्वाती मोहोळ यांना मेसेज आणि आक्षेपार्ह पोस्ट केली आहे.

मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याच्या नावानेच या धमक्या देण्यात येत आहेत. पुणे पोलिसांनी गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरु आहे. काही दिवसापूर्वीच पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची लग्नाच्या वाढदिवशीच गोळ्या झाडत करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरुच आहे

शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ आणि फिर्यादी अरुण धृपद धुमाळ यांनी गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्यापासून जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी गुरुवारी न्यायालयात याबाबतची माहिती दिली होती. दरम्यान आता अजून एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा स्वाती मोहोळ यांनी केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

गँगस्टर शरद मोहोळ याच्या पत्नीचा जीवाला धोका असल्याचा दावा; कोणापासून पाहा…

थरार! शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले…

Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड…

शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी ‘वाघ्या’ला अटक…

शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर…

गँगस्टर शरद मोहोळ याचा CCTVसमोरच का केला खून…

मुळशी पॅटर्न! गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येमागची INSIDE STORY…

शरद मोहोळची पत्नी कडाडली; नवरा वाघ होता तर मी वाघीण आहे…

कुख्यात गुंड शरद मोहोळ प्रकरण! पोलिसांनी आवळल्या आठही जणांच्या मुसक्या…

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!