
मुंबई पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर; कारण…
मुंबई : मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला एक धमकीचा मेसेज आला असून, मुंबईमध्ये मोठा बॉम्ब धमाका होणार असल्याचे अज्ञात व्यक्तीने म्हटले आहे. मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचेही या मेसेजमध्ये म्हटले आहे. धमकीचा मेसेज मिळताच मुंबई पोलिसांसह इतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत, या धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला एक धमकीचा मेसेज आला आहे. ज्यामध्ये मुंबईमध्ये सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले आहेत, मोठा धमाका होणार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी याबाबतची माहिती शहर पोलिस आणि गुन्हे शाखेला दिली. माहिती मिळताच पोलिसांच्या सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.
मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मेसेज त्यांना त्यांच्या हेल्पलाईन नंबर असलेल्या व्हाट्सअपवर आला आहे. धमकीचा मेसेज मिळताच पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू केला आहे. पोलिसांकडून मुंबईमधील काही महत्त्वाच्या ठिकाणांची तपासणी देखील करण्यात आली आहे, मात्र कुठेही काहीही आढळून आले नसल्याची माहती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला धमकीचा फोन…
मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन…
मुंबई पोलिसांच्या बनावट वेबसाईटप्रकरणी गुन्हा दाखल; बनावट वेबसाइट कशी ओळखाल…
मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून दहशतवादी कारवाईची धमकी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

