
लातूर हादरले! दोन सख्ख्या चुलत भावांची हत्या…
लातूर: लातूर जिल्ह्यात जुन्या वादातून दोन सख्ख्या चुलत भावांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महेश उत्तम सूर्यवंशी (वय 20 ) आणि विकास शिवाजी सूर्यवंशी (वय 23, दोघेही रा. रावणकोळा, ता. जळकोट, जि. लातूर) अशी मृत्युमुखी पडलेल्या चुलत भावांची नावे आहेत.
लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील रावणकोळ येथे हे दोन्ही भाऊ ऑनलाइन फॉर्म आणि कॅम्पुटरचे दुकान चालवत होते. मात्र, जुन्या वादातून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि दोन्ही भावांच्या पोटात धारदार शस्त्राने वार करून अतिशय निर्घुणपणे खून करण्यात आला आहे. धारदार शस्त्राने पोटात वार करत या दोन भावांची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मुख्य आरोपी प्रकाश मुरारी सूर्यवंशी आणि त्याच्याबरोबरच्या इतर चार जणांनी हातात धारदार शस्त्र घेत महेश आणि विकास या दोन्ही चुलत भावावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही भावाचा जागीच मृत्यू झाला होता. मागील काही वर्षापासून यांच्यामध्ये वाद होता. जुन्या वादाची कुरापत काढून पुन्हा भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरत मुख्य आरोपी प्रकाश मुरारी सूर्यवंशी आणि इतर चार जणांनी या दोन भावावर हल्ला केला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती जळकोट पोलीस ठाण्याला कळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह जळकोट येथील दवाखान्यात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत. पोलिसांनी तात्काळ पाचपैकी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. तीन जणांपैकी एक महिलेचा समावेश आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर…
मुंबईत एन्काऊंटर केलेल्या गँगस्टरच्या गर्लफ्रेंडची हत्या…
सांगली हादरली! एकाच कॉलेजमधील येथील विद्यार्थी, विद्यार्थिनीची आत्महत्या…
‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याच्या भावाने केली आत्महत्या…
पुणे शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रानेच केली मित्राची हत्या…
महाराष्ट्र हादरला! एकाच कुटुंबातील तिघांची गळा चिरून हत्या…

