वाघोलीमध्ये मुलीचा खून करणाऱ्या बापास युनिट ६ने तीन तासात केली अटक…

पुणे (संदीप कद्रे): वाघोली येथे स्वतःच्या मुलीची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम बापास गुन्हे शाखा युनिट ६ने अवघ्या ०३ तासात जेरबंद केली आहे. फकीरा गुंडा दुपारगुडे असे अटक करण्यात आलेल्या बापाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रच्या पाठीमागे फकीरा गुंडा दुपारगुडे याने त्याचीच १० वी मध्ये शिकत असणारी मुलगी अक्षदा दुपारगुडे हिचा स्वतःचे राहते घरात धारदार शस्त्राने सपासप वार करुन निर्घुण खुन करुन आरोपी पळून गेला. ०३/०१/२०२४ रोजी ही घटना घडली होती. सदरबाबत लोणीकंद पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ०८/२०२४ भा.दं.वि. कलम ३०२ आर्म अॅक्ट ४ (२७) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा समांतर तपास युनिट ६ कडील अधिकारी व अमंलदार करत होते. आरोपी फकीरा गुंडा दुपारगुडे हा गाडीतळ, हडपसर पुणे येथे थांबलेला आहे अशी खात्रीशीर माहिती बातमीदारा मार्फत मिळाली. सदर बातमीची खातरजमा करण्यासाठी वरिष्ठांचे सूचनेप्रमाणे तात्काळ युनिट-६ कडील अधीकारी व अंमलदार असे हडपसर भागात पुणे सोलापुर रोडवर जावुन बातमीतील वर्णनाच्या इसमासाचा शोध घेत असताना गाडीतळ परिसरात एकाची संशयितरित्या हलचाली असताना घाई-गडबडीत सोलापुरकडे बसमधुन जाण्याच्या तयारीत दिसला. त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो पळुन जाऊ लागला असता त्यास पथकातील अधीकारी व अंमलदार यांनी पाठलाग करुन शिताफिने ताब्यात घेतले. फकीरा गुंडा दुपारगुडे (वय-४५ वर्षे धंदा मजुरी रा- वाघोली सरकारी हॉस्पीटल जवळ, संदीप सातव यांचे खोलीत नगर रोड जवळ वाघोली पुणे) असे आरोपीचे नाव आहे.

गुन्हयाबाबत विचारपुस केली असता घरामध्ये त्याची व त्याची पत्नी व मुलगा तसेच मयत मुलगी यांचेत मी काहीही काम करत नाही व काहीही पैसे कमवत नाही. दारु पितो यावरुन वाद-विवाद होत होते. त्यामुळे सततच्या भांडणाला कंटाळुन मी ०३/०१/२०२४ रोजी सकाळी माझा मुलगा व पत्नी घरात नसताना माझी मुलगी अक्षदा हिचे सोबत दारु पिणेचे कारणावरून वाद झाल्यामुळे घरात असलेल्या उस तोडण्याच्या धारदार कोयत्याने सपासप वार करून तिला जिवे ठार मारल्याचे सांगीतल्याने त्यास लागलीच ताब्यात घेवुन गुन्हयाचे पुढील कार्यवाही कामी लोणीकंद पोलिस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेशकुमार, रामनाथ पोकळे, सह पोलिस आयुक्त, पुणे शहर, अमोल झेंडे, पोलिस उपआयुक्त, गुन्हे, सतिश गोवेकर, सहा.पोलिस आयुक्त, गुन्हे – २ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलिस निरीक्षक उल्हास कदम, पोलिस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलिस अंमलदार विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, नितीन मुंडे, प्रतिक लाहीगुडे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे व ज्योती काळे यांनी केली.

वाघोली येथे चोरी करणाऱ्याला युनिट 6ने घेतले ताब्यात अन्…

वाघोलीत पिझ्झा डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण अन् हवेत गोळीबार…

वाघोलीत घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास युनिट ६ने केली अटक…

लोणीकंद पोलिसांनी समलैंगिक संबधातून खून करणाऱ्याला केली अटक…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!