यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल…

यवतमाळ : यवतमाळमध्ये वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवानी ढोले असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे.

शिवानी ढोले ही वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होती. गुरुवारी (ता. २८) मध्यरात्री १२च्या सुमारास विद्यार्थीनीने गळफास घेतल्याची माहिती मिळत आहे. तिच्या आत्महत्येने विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. शिवानी ढोले ही मूळची धाराशिवची असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, शिवानीच्या आत्महत्या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. तर दुसरीकडे मेडिकल कॉलेज प्रशासनाकडून आत्महत्या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

विद्यार्थ्याने फीसाठी पैसे नसल्याने केली आत्महत्या; चिठ्ठीत लिहीले की…

फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या…

सोलापुरात शिकाऊ डॉक्टरची रेल्वेसमोर उडी, शरीराचे झाले दोन तुकडे…

पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!