Video: महिलेचा कॉन्स्टेबलमुळे वाचला महिलेचा जीव…

मुंबईः रेल्वे स्थानकात एका महिला प्रवाशाचा जीव धाडसी महिला कॉन्स्टेबलच्या सतर्कतेमुळे थोडक्यात बचावला आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, महिला कॉन्स्टेबलवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील ही घटना घडली आहे. मुंबईच्या धावपळीच्या प्रवासात अनेकदा प्रवाशी जीव धोक्यात घालून रेल्वे पकडताना दिसतात. अनेकांना धावती रेल्वे पकडताना जीव गमवावा लागला आहे. शिवाय, अनेकदा पोलिसांनी प्रवाशांचा जीव वाचविला आहे.

सध्या सोशल मीडियावर मुंबईतील एका रेल्वे अपघातात थोडक्यात बचावलेल्या माहिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक महिला चालत्या रेल्वेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होती. अचानक रेल्वेच्या पायरीवरून तिचा पाय घसरला आणि ही महिला रेल्वेमधून खाली फलाटावर पडते. यावेळी क्षणाचाही विलंब न करता रेल्वे स्थानकावर गस्तीला असणाऱ्या महिला कॉन्स्टेबलने मदतीचा हात पुढे केला. या अपघातग्रस्त महिलेचा कॉन्स्टेबलने पाय धरत तिला बाहेर खेचून काढले आणि महिलेचा जीव वाचवला आहे.

kashmir
kashmir

Video: पोलिसाने पळत जाऊन घातली चोरट्यांच्या दुचाकीला लाथ…

Video: जवानाने प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी…

Video: युवतीसोबत डान्स करणं होमगार्डला पडलं महागात…

Video: पत्नीला धक्का लागला म्हणून मारहाण; युवक रुळावर पडला अन् क्षणात…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!