आई तुळजाभवानीचा चांदीचा मुकुट गायब; गुन्हा दाखल…

धाराशिव (प्रतिक भोसले) : तुळजाभवानी मंदिरातील दागिने चोरी प्रकरणात महंत हमरोजीबुवा, गुरु चिलोजी बुवा, महंत चिलोजी बुवा गुरु हमरोजी बुवा, महंत वाकोजीबुवा गुरु तुकोजी बुवा व महंत बजाजी बुवा गुरु वाकोजी बुवा यांच्यासह सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले, सेवेदार पलंगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

तुळजाभवानी देवीचा सोन्याचा सुमारे एक किलो वजनाचा मुकुट गहाळ झाल्याच्या वृत्ताने सगळीकडेच खळबळ माजली होती. त्यानंतर मंदिर प्रशासनाने सारवासारव करीत सोन्याचा मुकुट सापडल्याचा दावा केला आहे.

तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातून ६३ भार वजन असलेला चांदीचा रेशमासह मुकूट गहाळ झाला असल्याचे समोर आले आहे. मंदिर संस्थानाच्या वतीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत तसा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. सन २०११ पूर्वी चांदीचा मुकूट मंदिरातून गायब झाला असल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर चांदीची प्रभावळ, चांदीचे त्रिशूळ, मोत्याचे आणि सोन्याचे तुकडे असा दुर्मीळ आणि पुरातन अलंकाराचा मोठा ऐवज तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातून गायब करण्यात आला आहे. पोलिस आता वस्तुस्थिती नक्की काय, याचा तपास करीत आहेत. दरम्यान, तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तहसीलदार सोमनाथ माळी यांना तक्रार देण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केले. माळी यांनी दिलेल्या तक्रारीत डबा क्र. ७ मधील रेशमासह ४३ भार वजन असलेल्या चांदीच्या मुकुटाचा अपहार झाला असल्याचे म्हटले आहे. हा चांदीचा मुकूट महंत चिलोजीबुवा यांच्या ताब्यात होता.

तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील एक ते सात डब्यात असलेल्या पुरातन, दुर्मीळ आणि मौल्यवान अलंकारांपैकी १७ अलंकार खजिन्यातून गायब झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांपैकी चार तुळजाभवानी देवीचे महंत आहेत. या चार महंतांपैकी तीन महंत मृत असून, महंत चिलोजीबुवा हे एकमेव आरोपी सध्या हयात आहेत. तत्कालीन सहायक धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले यांच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तेही आजघडीला हयात नाहीत. तर पलंगे, असे अडनाव असल्यामुळे नेमके कोणते पलंगे आरोपी, असा संभ्रम सध्या तुळजापूर शहरात निर्माण झाला आहे. एक अज्ञात आरोपी असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्या वेळी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या आढाव्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महंत चिलोजीबुवा हेही उपस्थित होते.

दरम्यान, या प्रकरणी कलम 420, 406, 409, 381 व 34 आयपीसीनुसार तुळजापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी SIT ची निर्मिती करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी उपअधीक्षक दर्जाचा अधिकाऱ्याची एसआयटी तयार केली आहे.

तुळजाभवानी मंदिराची बनावट वेबसाईट, अ‍ॅप बनवून भाविकांना गंडा…

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे कार्य कौतुकास्पद: पद्मश्री कल्याण सिंह रावत

आयपीएस अतुल कुलकर्णी: जमिनीवर राहून काम करणारा अधिकारी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!