मंचर पोलिसांची अवैध दारू धंद्यावर कारवाई…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): मंचर (ता. आंबेगाव जि. पुणे) येथील महात्मा गांधी विद्यालयासमोर नाशिक हायवे रोडवर अवैद्य दारू विक्री करणाऱ्या दोघांवर मंचर पोलिसांनी कारवाई केली असून, त्यांच्याकडून एक लाख 93 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मंचर पोलिसांना 16/12/2023 रोजी अवैध दारू विक्री प्रकरणी माहिती मिळाल्यावरून मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी पोलिस पथकास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलिस कारवाईत रामदास दत्तात्रय चिखले (वय वर्ष 40 रा. मोरवाडी मंचर ता. आंबेगाव मूळ राहणार पेठ पारगाव जि.पुणे) व दीपक संभाजी खोंद्रे (वय 33, रा. धायकर वाडा गावठाण मार्केट जवळ गांधी चौक मुंडवा पुणे) एम एच 12एस. के 0215 या वाहनांमधून बेकायदा बिगर परवाना देशी-विदेशी दारूचे बाटल्या असलेले बॉक्स आढळून आले. एकूण किंमत रुपये 93 हजार 500 रुपये व एक लाख रुपये किंमतीची रिक्षा असा मुद्दे माल जप्त केला आहे.

दरम्यान, पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस हवालदार हिले करत आहेत.

थरार! मंचर येथे दरोडेखोरांचा डाव उधळला; कसा पाहा…

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू…

लोणीत घरफोडी केलेल्या गुन्हेगारास सातारा पोलिसांनी केली अटक…

पुणे जिल्हा हादरला! पित्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!