
यवतमाळ जिल्ह्यातील विधवा महिलेवर पुण्यात बलात्कार; गुन्हा दाखल…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : साखरतांडा येथील एका विधवा महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी जागेश्वर राठोड विरुद्ध पारवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील साखरतांडा येथील एका 28 वर्षीय विधवा महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी जागेश्वर सुभाष राठोड (वय 35, रा. साखरतांडा ता. आर्णी (ह. मु. पुणे) विरुद्ध 354, 354 (A), 376 (2) (N), 417 अंतर्गत गंभीर स्वरुपाचे गुन्हे पारवा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सदरचा गुन्हा अगोदर सावळी (सदोबा) दुरक्षेत्र येथे आकरन्स क्रमांक 436/2023 अंतर्गत नोंदविण्यात आला होता. आरोपी जागेश्वर राठोड हा फरार असून, पारवा पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पारवा पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण लिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सावळी (सदोबा) दुरक्षेत्राचे पोलिस उप निरीक्षक संदीप बारींगे हे पुढील तपास करीत आहे.
पारवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जागेश्वर सुभाष राठोड हा 28 वर्षीय पीडित विधवा महिलेकडे वारंवार पाहत होता. तसेच आरोपी जागेश्वर हा स्वतःच्या पत्नीला फार्कत देऊन तुझ्याशी लग्न करतो असे आमिष दाखवून पुणे येथे घेऊन गेला. पुणे येथे फिर्यादी विधवा महिलेची इच्छा नसतांना आरोपीने तिचे सोबत वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपीने पीडित विधवा महिलेला फोन वगैरे केला नाही व तिला भेटायला सुद्धा गेला नाही. तसेच लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित केले, अशा फिर्यादी विधवा महिलेच्या जबानी रिपोर्ट वरुन आरोपी जागेश्वर राठोड विरुद्ध पारवा पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. पारवा पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक संदीप बारींगे हे पुढील तपास करीत आहेत.
बीड हादरलं! चिमुकलीवर पडक्या रूममध्ये सामूहिक बलात्कार…
सासऱ्याने केला सुनेवर बलात्कार; तक्रार दाखल…
युवतीवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार; व्हिडिओ व्हायरल…
गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार…
प्रियकरासोबत पुण्यात पळून आलेल्या युवतीवर बलात्कार…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

