
चंदननगर पोलिसांनी २५० सीसीटीव्ही तपासून आरोपीस केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात दिवसा रिक्षा भाडे निमित्ताने फिरुन चोरीचे ठिकाणांची पाहणी करुन रात्रीचे वेळेस घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. चंदननगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.
१४/११/२०२३ रोजी दुपारी ०१/०० वा ते १७/११/२०२३ रोजी ०२.३० वा दरम्यान फिर्यादी अब्दुल रहेमान अजिज सय्यद, रा.स.नं.४४/४, प्लॉट नं. ८, तुकाई हॉस्पीटल समोर, खराडी रोड, सदगुरुनगर, चंदननगर, पुणे हे त्यांचे राहते घर लॉक करुन मदुराई येथे गेले होते. अज्ञात आरोपी यांनी त्यांचे घराचे कुलुप तोडुन त्यांचे घरातील डेल कंपनीचा लॅपटॉप, पोर्टबल एचडीडी, परदेशी चलणातील नोटा, चलन, नोटा, डॉलर असा एकुण २,१२,६२४/- रुपये किंमतीचा माल चोरी केली म्हणून चंदननगर पोलिस स्टेशन गु.रजि.नं.५४६/२०२३, भा.दं. वि. ३८०, ४५४, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना तपास पथकातील पोलिस शिपाई ८३१८ सुभाष आव्हाड, पोना ७३२९ शिवा धांडे यांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व सुमारे २५० सीसीटीव्हीची पाहणी करुन रेकॉर्डवरील गुन्हेगार रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिकेत भाऊराव गायकवाड (वय २१, रा. संत तुकाराम नगर, एम के चौक, नवी सांगवी) यास ताब्यात घेतले. त्याच्या कडुन गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपी हा दिवसा रिक्षाचे भाडे करीत असताना चोरी करण्याचे ठिकाणांची पाहणी करुन रात्रीचे वेळेस घरफोडी करीत असत.

सदरची कारवाई अपर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलिस उप आयुक्त शशिकांत बोराटे, संजय पाटील, सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली व राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चंदननगर पोलिस स्टेशन, पुणे शहर, मनिषा पाटील, पोलिस निरीक्षक, गुन्हे, चंदननगर पोलिस स्टेशन, पुणे शहर यांचे दिमतीत तपास पथकाचे सपोनि प्रशांत माने, पोउपनिरी अरविंद कुमरे, पोउनि प्रमोद हंबीर, पोहवा २११५ दिलावर सय्यद, पोलिस नाईक ७३२९ शिवा धांडे, पोलिस शिपाई ८३६१ विकास कदम, पोलिस शिपाई ८५६३ गणेश हंडगर, पोलिस शिपाई ८३१८ सुभाष आव्हाड, पोलिस शिपाई ४३५२ श्रीकांत कोद्रे, पोलिस शिपाई ३९३३ सुरज जाधव यांनी केलेली आहे.
पुणे शहरात युवकाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून…
पुणे शहरात चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची गळा चिरुन हत्या; चिमुलकली पोरकी…
पुणे शहरात पत्नीची हत्या करून पोलिसांसमोर आत्मसमर्पण…
प्रेमसंबंधात अडथळा! पुणे शहरात वेबसिरिज पाहून केला खून अन् मृतदेह…
पुणे पोलिसांची मोठी कारवाई; रात्रीत 159 गुन्हेगारांना अटक…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

