
स्वारगेट अत्याचार प्रकरण! पीडित युवतीला सुनावणीवेळी रडली ढसाढसा…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकात गेल्या वर्षी शिवशाहीमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी सुरू झाली. घटनाक्रम सांगत असतानाच पीडित युवतीला अश्रू अनावर झाले. पीडितेची मानसिक स्थिती अत्यंत अस्वस्थ असल्याने न्यायालयाने पहिल्या दिवसाचे कामकाज तहकूब करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणाची पुढील सुनावणी दि. 5 डिसेंबर रोजी होणार आहे.
स्वारगेट बसस्थानकामध्ये 25 फेब्रुवारी 2025 रोजी बसमध्ये युवतीवर (वय २६) अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला पोलिसांनी 28 फेब्रुवारी 2025 रोजी शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली. एप्रिल 2025 मध्ये न्यायालयात पोलिसांनी आरोपीवर सुमारे 893 पानांचे आरोपपत्र दाखल केले, त्यानंतर जून 2026 मध्ये न्यायालयाने गाडेवर दोषारोपपत्र निश्चित केले. सरकारी पक्षातर्फे न्यायालयात 87 साक्षीदारांची यादी व पुरावे सादर करण्यात आले आहेत. या खटल्याचे कामकाज शनिवारपासून जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. देशमुख यांच्या न्यायालयात सुरू झाले आहे.
View this post on Instagram
खटल्याच्या पहिल्याच दिवशी पीडितेची साक्ष नोंदवण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र सुनावणीदरम्यान घटनाक्रम कथन करत असताना पीडितेला रडू कोसळले. ही परिस्थिती पाहता न्यायालयाने पीडितेला सावरण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी काही वेळ विश्रांती दिली. मात्र, या विश्रांतीनंतरही पीडितेची मानसिक स्थिती अत्यंत अस्वस्थ होती. त्यामुळे खटल्याचे शनिवारचे कामकाज तहकूब करण्याचा न्यायालयाने निर्णय घेतला. या गंभीर प्रकरणाचे कामकाज प्रभावीपणे चालवण्यासाठी राज्य शासनाने ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची ‘विशेष सरकारी वकील’ म्हणून नियुक्ती केली आहे.
स्वारगेट प्रकरण! आरोपी दत्ता गाडे याने 22 हजार वेळा पाहिले अश्लिल व्हिडीओ…
स्वारगेटच्या आरोपीबाबत पीडितेने जबाबात सगळं सांगितलं; आरोपीच्या खात्यात…
पुणे! स्वारगेट प्रकरणातील पीडित युवतीचे पोलिसांवर गंभीर आरोप…
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड; तहान लागली अन्…
स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपीच्या वकिलांचा धक्कादायक दावा…

