मुंबईतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची अचानक बदली; फटाके वाजवून सेलिब्रेशन अन् महिला कॉन्स्टेबलची दहशत…

मुंबईः अंधेरी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्याचे ‘ट्रान्सफर सेलिब्रेशन’ सध्या पोलिस दलात चर्चेचा विषय ठरत आहे. या महिला कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बदलीनंतर जंगी सेलीब्रेशन करत अंधेरी पोलिस ठाण्यात अक्षरश: धुमाकूळ घातल्याचे सांगितले जाते. पोलिस शिपाई असलेल्या या महिला कर्मचाऱ्याचा पती आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितले जाते. त्याची भीती दाखवून संबंधित महिला कर्मचारी अंधेरी पोलिस स्टेशनमधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करत असल्याचीही माहिती समोर आली आहे.

महिलेच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांची मुंबई पोलिस विशेष शाखा-1 मध्ये बदली करण्यात आली आहे. बदलीचा आदेश निघाल्यानंतर महिला पोलिस शिपायाने पोलिस ठाण्याच्या आवारात फटाके फोडून आनंद साजरा केल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी घडलेला हा प्रकार पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, मुंबईतील पोलिस दलात याची चर्चा रंगली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

वरिष्ठ निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांना महिला पोलिस कर्मचाऱ्याकडून कारवाईच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप या महिला कर्मचाऱ्याने केला होता. संबंधित महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर मच्छिंद्र यांची बदली झाल्याची कुजबुज सुरु आहे. महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीवर विभागीय चौकशी न करताच उमेश मच्छिंद्र यांची बदली झाल्याची चर्चा पोलिस दलात रंगली आहे. संबंधित महिला कर्मचारी कामे टाळत असल्याचा, काम सांगितल्यास आत्महत्येची धमकी देत असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

संबंधित महिला कर्मचाऱ्याचे पती आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून ती सहकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचाही आरोप आहे. महिला शिपाई विरोधात वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांनी चार रिपोर्ट पाठवून देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हात डोक्यावर असल्यामुळे महिलेवर कारवाई होत नसल्याची जोरदार चर्चा पोलिस दलात आहे. 13 नोव्हेंबर रोजी पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीत उमेश मच्छिंद्र यांच्या बदलीचा निर्णय झाला. ही बदली करताना सार्वजनिक हित, कायदा व सुव्यवस्था आणि प्रशासकीय गरज हे कारण देण्यात आले. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक अजय कुलकर्णी यांनी बुधवारी अंधेरी पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला. उमेश मच्छिंद्र यांची अंधेरी पोलिस ठाण्यात 18 महिन्यांची सेवा झाली होती. आणखी सहा महिने त्यांचा कार्यकाळ बाकी होता. त्यांना सहाय्यक पोलिस आयुक्तपदी पदोन्नती मिळण्याचीही शक्यता होती.

दरम्यान, संबंधित महिला ड्युटीदरम्यान कामात चुकारपणा करणे आणि कोणी जाब विचारल्यास किंवा काम सांगितल्यास खोट्या तक्रारी करून बदनामी व मानसिक त्रास देण्याची भीती दाखवली जात असल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते. कर्तव्यापेक्षा तिला मॉडेलिंग आणि ग्लॅमरची अधिक ओढ असल्याचीही दलात चर्चा आहे. मात्र, पतीच बडा अधिकारी असल्याने या महिला पोलिसाची तक्रार कुठं करायची अशी हतबलता पोलिस दलातील काहींनी व्यक्त केली.

यापूर्वीही काही अधिकाऱ्यांना अशाच तक्रारींचा सामना करावा लागल्याची उदाहरणे चर्चिली जात आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेल्या कथित ओळखींचा वापर करून ती दबाव आणत असल्याचा आरोप दलातील कुजबुजीत पुढे येत आहे. त्यामुळे या महिला कॉन्स्टेबलच्या कथित मनमानी आणि वर्तनाविरोधात वरिष्ठ पातळीवरून नेमकी काय कारवाई होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सीआयडीच्या पोलिस अधीक्षक वैशाली माने यांच्या रोखठोक वक्तव्यानंतर बदली रद्द…

पुणे पोलिस दलातील अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली; अन्याय झाल्याची भावना…

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बंगल्यात पोलिस कर्मचाऱ्याकडून कार घुसवण्याचा प्रयत्न अन्…

एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्टमधील पोलिस अधिकाऱ्याचे निधन…

पोलिस उपनिरीक्षकाने खाकी वर्दीतच धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!