
अहिल्यानगर! पत्नीचं लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध अन् दोघांना पकडले रंगेहाथ…
अहिल्यानगर : पत्नीचं लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध आणि त्यातून निर्माण झालेल्या वादातून एका तरुणाचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह थेट कालव्यात फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. गणेश मच्छिंद्र गायकवाड (वय ३२, रा. कमलपूर, ता. श्रीरामपूर) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी महेश राजेंद्र जाधव आणि योगेश राजेंद्र जाधव या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश जाधव याची पत्नी शुभांगी हिचे गणेश गायकवाड याच्याशी लग्नापूर्वीपासून प्रेमसंबंध होते. गणेश हा शुभांगीला भेटण्यासाठी शिंगवे नाईक येथे आला होता. याचवेळी महेश जाधव आणि योगेश जाधव यांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याला मारहाण करून ठार मारले. या घटनेची कोणालाही माहिती होऊ नये आणि गुन्ह्याचा पुरावा नष्ट व्हावा, या उद्देशाने दोघांनी गणेशचा मृतदेह राहुरी कृषी विद्यापीठाजवळील मुळा धरणाच्या बॅकवॉटर कालव्यात फेकून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
View this post on Instagram
गणेशचा भाऊ प्रदीप मच्छिंद्र गायकवाड (वय ३४, रा. कमलपूर, ता. श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात हत्येचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि दोघांना अटक करण्यात आली. आरोपींकडे चौकशी केल्यानंतर गणेशचा मृतदेह मुळा धरणाच्या बॅकवॉटर कालव्यात फेकून दिल्याची माहिती समोर आली. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी तातडीने पथक तयार करून कालव्याच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली. कालव्याच्या विविध भागात शोध घेत असताना अखेर राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढा येथे गणेशचा मृतदेह आढळून आला. महेश जाधव आणि योगेश जाधव या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि नगर ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात, पोलिस उपनिरीक्षक अजय कौटे यांच्यासह एमआयडीसी पोलिस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच सहायक पोलिस निरीक्षक हरीश भोये यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली.
नवऱ्याला दीड लाख पगार अन् प्रियकरासोबत पत्नीला रंगेहाथ पकडले…
प्रियकरासोबत पत्नीला रंगेहाथ पकडले आणि आहे त्याच स्थितीत लावले लग्न…
मामी करायची भाच्यावर लैंगिक अत्याचार; रंगेहात पकडले अन्…
कोल्हापूर! शिक्षकाला महिलेच्या घरात रंगेहाथ पकडले अन्…
प्रेयसीसोबत लॉजवर नवऱ्याला रंगेहाथ पकडलं; घाबरून मारली उडी…

