नाशिक! नवरात्र बंदोबस्तावरील पोलिसांना कारने उडवले; पोलिस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू तर…

नाशिक: सप्तश्रुंगी गड परिसरातील नांदुरी येथील अभोणा चौफुलीवर एका भरधाव अनियंत्रित कारने कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक (psi) विजय गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला असून, बंदोबस्तावरील ११ हून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि भाविक गंभीर जखमी झाले आहेत.

नवरात्रीनिमित्त सप्तश्रुंगी मातेच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक वणी गडावर येत आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुरळीत वाहतुकीसाठी प्रशासनाकडून ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नांदुरी येथील अभोणा चौफुलीवरही पोलिस कर्मचारी आणि अधिकारी विनासायास वाहतूक नियंत्रित करत असताना भरधाव वेगात आलेल्या एका चारचाकी वाहनाने पोलिसांना आणि रस्त्यावरील नागरिकांना उडवले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत सर्व जखमींना उपचारासाठी नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे काही जणांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याचे समजते.

दरम्यान, अपघातानंतर नागरिकांनी कार चालकाला मारहाण करत कारचे नुकसान केल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून कार चालकाला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात संबंधित पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या दुर्घटनेमुळे पोलिस दलासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्टमधील पोलिस अधिकाऱ्याचे निधन…

Video: पोलिस अधिकाऱ्याची राष्ट्रध्वजाला दिलेली सलामी ठरली अखेरची…

पोलिसांच्या वाहनाचा टायर फुटून अपघात; पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू…

मुंबई पोलिसातील IPS डॉ. सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन…

IPS अधिकाऱ्याचा पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना अपघाती मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!