सातारा! शिक्षक असलेल्या बापाने मुलीला संपवलं अन् AI ला विचारलं…

सातारा: एका शिक्षकाने आपल्या पोटच्या मुलीच्या डोक्यात रागाच्या भरात बॅट घालून तिची हत्या केल्याचा धक्कादायक घटना गोडोली येथे घडली आहे. आपल्या हातून मुलीची हत्या झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने 112 क्रमांकावर कॉल करुन पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी गेले होते. त्याठिकाणी पाहणी केल्यानंतर पोलिसांना संशय आला आणि त्यांनी कसून तपास केल्यानंतर पुरुषोत्तम कदम यानेच आपल्या लहान मुलीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बापाने रागाच्या भरात आपल्या मुलीची (वय १७) हत्या केल्यानंतर काहीवेळाने तो भानावर आला. जवळपास तीन तास आता काय करायचे, पोलिसांपासून कसे वाचायचे, याचा विचार करत बसला. यानंतर पुरुषोत्तम कदम याने एआयची मदत घेण्याचे ठरवले. मोबाईल काढून एआयला प्रश्न विचारला की, ‘माझ्या हातून नकळत मुलीचा खून झाला आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी काय करावे लागेल?’. त्यावर एआयने उत्तर दिले की, सॉरी, तुम्ही मोठी चूक केली आहे. मी गुन्हेगारीचे समर्थन करणारी माहिती देऊ शकत नाही. तुम्ही पोलिसांना कळवा’, असे उत्तर एआयने दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

एआयने मदत करायचे नाकारल्यानंतर पुरुषोत्तम कदम याने मुलीच्या अंगातील रक्ताने माखलेला टी-शर्ट काढला. तो वॉशिंग मशीनमध्ये तीनवेळा धुतला. तसेच फरशीवर पडलेले रक्ताचे डागही पाण्याने धुतले. त्यानंतर रक्ताने माखलेली बॅट टेरेसवर टाकली. त्यानंतर स्वत:ची एक खोटी थिअरी तयार करुन पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी विचारल्यावर पुरुषोत्तम कदम यांनी आपली मुलगी स्वत:च डोके भिंतीवर आपटून जखमी झाल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी संशय आल्याने त्यांनी घराची तपासणी केली. तेव्हा त्यांना भिंतीवर रक्ताचे डाग दिसले आणि त्यानंतर टेरेसवर रक्ताने माखलेली बॅट सापडली.

पोलिसांच्या तपासात रात्री टीव्हीच्या आवाजावरून वाद झाला असल्याचे समोर आले. यामध्ये संबंधित मृत मुलीने लहान बहिणीच्या डोळ्यावर मारहाण केल्याचे समोर आले. या वादातून संतापाच्या भरात वडील पुरुषोत्तम कदम याने मुलीच्या डोक्यात बॅटने जोरदार प्रहार केले. ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

युवतीला बाप-चुलत्याने हालहाल करून मारलं; पुण्यात संपवलं अन् सातारा…

सातारा! युवकाला कारच्या दरवाजाला लोमकळत 3 किमी फरफटत नेलं…

सातारा! अपघात नव्हे तर घातपात; प्रियकरासोबत राहण्यासाठी पतीचा काढला काटा…

सातारा! प्रेयसीने प्रेम संबधातून केला प्रियकराचा खून; कुऱ्हाडीने वार…

सातारा! पोलिसाच्या मृत्यूपूर्वीच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसने सगळ्यांनाच धक्का…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!