हृदयद्रावक! पैठणमध्ये भीषण अपघात बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू…

छत्रपती संभाजीनगर : पैठण येथे अरुंद रस्त्यावरील वळणावर नियंत्रण सुटल्याने एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील बापलेकीसह एका नातेवाइकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताचा सीसीटीव्ही देखील आता समोर आला आहे.

कृष्णा अशोक गायकवाड (२५), त्यांची पाच वर्षाची मुलगी छकुली कृष्णा गायकवाड आणि अशोक गणेश भालेराव अशी मृतांची नावे आहेत. मृत अशोक भालेराव यांच्या मागे आई, पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. तर कृष्णा गायकवाड यांच्या मागे आई-वडील, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

कृष्णा गायकवाड आणि अशोक भालेराव हे दोघे सख्खे साडू छकुलीसह पैठण येथून आगरनांदरकडे दुचाकीवर निघाले होते. छत्रपती संभाजीनगर आगार क्र. २ ची एसटी बस (क्रमांक एमएच ०६, बीएल ४३६९) पैठण शहरातून मार्गस्थ होत असताना या बसने शहरातील एका कापड दुकानासमोर त्यांच्या दुचाकीला (क्र. एमएच २०, जीए २९७९) पाठीमागून जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य केले. तसेच तिघांचेही मृतदेह पैठण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. यावेळी रुग्णवाहिकेच्या मदतीने तिन्ही मृतदेह पैठणच्या शासकीय वैद्यकीय आरोग्य प्रशिक्षण केंद्रात हलवण्यात आले आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून अपघातातील एसटी बस आणि दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे. मात्र या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

ट्रकने पिकअप व्हॅनला दिलेल्या धडकेत धामणगावजवळ ५ प्रवासी मृत्यूमुखी…

समृद्धी महामार्गावरून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जाताना भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू…

वाहनावरील नियंत्रण सुटल्याने खारेगावमध्ये अपघातात महिला मृत्यूमुखी; दोन पादचारी गंभीर जखमी…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर शोककळा; लेखकाचे अपघाती निधन…

ठाणे-बेलापूर मार्गावर भीषण अपघात; जावई आणि सासऱ्याचा दुर्दैवी मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!